scorecardresearch

‘या’ गोष्टीमुळे समांथा आणि नागा चैतन्यच्या नात्यात पडली फूट?; चर्चांना उधाण

समांथा आणि नागा चैतन्य २०१० मध्ये रिलेशनशिपमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये गोव्यात लग्न केले.

‘या’ गोष्टीमुळे समांथा आणि नागा चैतन्यच्या नात्यात पडली फूट?; चर्चांना उधाण
समांथा आणि नागा चैतन्य २०१० मध्ये रिलेशनशिपमध्ये आले होते.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि पती नागा चैतन्यची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. सध्या त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत की हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्यात आलेल्या या दुराव्यामुळे चाहते दु: खी आहेत, कारण या बातमीमुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्या दोघांच्या चाहत्यांची फक्त एकच इच्छा आहे की ते दोघे लवकरच एकत्र आले पाहिजेत. मात्र, त्यांच्या विभक्त होण्याचे कारण हे समांथाच्या बोल्ड भूमिका आणि बोल्ड फोटोशूट असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात फूट पडण्याचे कारण समांथाचे चित्रपट आणि करिअरवर असलेले तिचे प्रेम आहे. लग्नानंतरही समांथा चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि ग्लॅमरस फोटोशूट करत राहते. पण पती नागा चैतन्य आणि तिचे सासरे नागार्जुन यांना हे आवडत नाही. दोघेही समांथाला तिचे मन बदलण्यासाठी आणि सासू अमला अक्किनेनीच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

दरम्यान, ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये समांथाने बोल्ड भूमिका साकारली होती. त्याचा परिणाम हा नागा चैतन्य आणि तिच्या वैवाहिक जीवनावर पडला आहे. यामुळे ते दोघे विभक्त होणार आहेत अशा चर्चा सुरु आहेत. एवढंच नाही तर अलीकडेच त्या दोघांनी कौटुंबिक न्यायालयात जाऊन वकिलाची भेट घेतली असे म्हटले जात आहेत. आता या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे तर येत्या काळात कळेल.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

समांथा आणि नागा चैतन्य हे २०१० मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. त्या दोघांनी गोव्यात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न केले. समांथा आणि नागा चैतन्य चित्रपटाच्या सेटवर रिलेशनशिपमध्ये आले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या