आर्यन प्रकरणानंतर विमानतळावर फोटोग्राफर्सपासून लपण्यासाठी शाहरुखने वापरली ही क्लुप्ती?

सध्या शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख रविवारी, ७ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून मुंबईत परत आला आहे. शाहरुखचे प्रायवेट जेट मुंबईतील कलिना विमानतळावर उतरवण्यात आले होते. पण विमानतळावर उतरल्यानंतर फोटोग्राफरला टाळण्यासाठी शाहरुखने चक्क छत्रीचा वापर केला असल्याचे म्हटले जात आहे. त्याचा छत्री घेऊन जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखचा बॉडिगार्ड गाडीच्या शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. तसेच एक व्यक्ती काळ्या रंगाची छत्री घेऊन शाहरुखला गाडीपर्यंत सोडत असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत विरल भय्यानीने शाहरुखची संपूर्ण टीम दिल्लीहून मुंबईत परत आली आहे. कलिना विमानतळावरील हा व्हिडीओ आहे या आशयाचे कॅप्शन दिले आहे. पण छत्रीच्या आड असणारी ती व्यक्ती शाहरुखच आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आणखी वाचा : ‘जय भीम’मधील त्या सीनवर प्रकाश राज यांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर शाहरुखने सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केलेली नाही. तसेच या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देखील अद्याप दिलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Is shah rukh khan hides under an umbrella at mumbai private airport to avoid paparazzi avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या