VIDEO: भावाला टक्कर देण्यासाठी ईशान सज्ज

‘सैराट’च्या हिंदी रिमेकसाठीही त्याची निवड करण्यात आली आहे

shahid, ishaan
शाहिद कपूर, ईशान खत्तर

बॉलिवूडमध्ये बरेच कलाकार त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग किंवा सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेपासून करतात. पण, असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटांमधून ‘बॅकग्राऊंड डान्सर्स’ म्हणून या कलाविश्वात पदार्पण केलं. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता शाहिद कपूर. अभिनयासोबतच शाहिद त्याच्या नृत्य कौशल्यासाठीही ओळखला जातो. सहसा चित्रपटांमध्ये कलाकारांना नृत्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. पण, शाहिद याला अपवाद ठरतो.

शाहिदच्या नृत्यकौशल्यालाच टक्कर देण्यासाठी आता त्याचा भाऊ इशान खत्तर सज्ज झाला आहे. इशानने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो ‘लॉकिंग अॅण्ड पॉपिंग’ हा नृत्यप्रकार सादर करताना दिसत आहे. मित्रमंडळींच्या आग्रहाखातर ईशानने हे नृत्य सादर केले. त्याचे नृत्यकौशल्य पाहता शाहिदला टक्कर देण्यासाठी तो सज्ज आहे असेच म्हणावे लागेल.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

फक्त नृत्याच्याच बाबतीत नव्हे तर, अभिनयाच्या बाबतीतही ईशानने आपल्या भावाच्या म्हणजेच शाहिदच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. मजिद मजिदी दिग्दर्शित ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून ईशानने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. बॉलिवूडमध्येही ईशान ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ishaan khattar moves like brother bollywood actor shahid kapoor watch video

ताज्या बातम्या