scorecardresearch

‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड

“‘द काश्मीर फाइल्स’ हा एक प्रोपगंडा चित्रपट असून त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान नाही.”

‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

इस्रायली चित्रपट निर्माते आणि इफ्फीचे ज्युरी नदाव लॅपिड यांनी भारतीय चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ चित्रपट म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर नदाव यांनी आपण या चित्रपटाला व्हल्गर का म्हटलं याचं कारण दिलं होतं. दरम्यान, आता त्यांनी ‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम चित्रपट आहे, पण तो प्रचारकी चित्रपटच आहे, असं म्हटलंय.

‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ म्हणणाऱ्या लॅपिड यांचा अन्य ज्युरींबद्दल मोठा खुलासा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”

इंडिया टुडेशी बोलताना, नदाव म्हणाले, “प्रोपगंडा म्हणजे काय हे कोणीही ठरवू शकत नाही, मी हे सत्य स्वीकारतो की ‘काश्मीर फाइल्स’ हा एक अप्रतिम चित्रपट आहे. मी जे पाहिलं, ते सांगणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी ते वक्तव्य केलं. हा चित्रपट पाहिल्यानंतर इतर ज्युरी सदस्यांनाही असंच वाटलं, परंतु ते यावर उघडपणे बोलले नाहीत. ‘द काश्मीर फाइल्स’ हा एक प्रचारकी चित्रपट असून त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान नाही,” असंही ते म्हणाले.

‘द काश्मीर फाइल्स’संदर्भातील वादानंतर नदाव लॅपिड यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी त्याला व्हल्गर म्हणालो कारण…”

यावेळी नदाव यांनी राजकीय दबावापोटीच या चित्रपटाचा इफ्फीमध्ये समावेश करण्यात आला, असंही म्हटलं. आपल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया नोंदवत नदाव इस्त्रायली वृत्तपत्र हारेट्झला म्हणाले, “वाईट चित्रपट बनवणे हा गुन्हा नाही, परंतु हा एक अतिशय क्रूर, लोकांची मतं बदलणारा आणि हिंसक प्रचार करणारा चित्रपट आहे. हे सत्य आहे की इस्रायलमध्ये एक दिवस असाच चित्रपट बनेल, याची मी कल्पना करू शकत नाही. पण जर बनला तर, तेव्हा जे कुणी ज्युरी सदस्य असतील ते आज जे मी बोलतोय, तसंच त्या चित्रपटाबद्दल बोलल्यास मला आनंद होईल. ज्या ठिकाणी मला आमंत्रित केलं होतं, तिथे मला जे वाटलं ते बोलणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं,” असं नदाव यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 09:51 IST

संबंधित बातम्या