scorecardresearch

Jab Harry Met Sejal Mini Trail 5: होणाऱ्या नवऱ्याने दिलेली अंगठी अनुष्काने हरवली?

अनुष्काचा वेंधळेपणा यात पूर्णपणे दिसून येतो

Jab Harry Met Sejal Mini Trail 5: होणाऱ्या नवऱ्याने दिलेली अंगठी अनुष्काने हरवली?
शाहरुख खान, अनुष्का शर्मा

शाहरुख खानने नुकताच ‘जब हॅरी मेट सेजल’चा पाचवा मिनी ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. यात अनुष्काचा वेंधळा स्वभाव दिसून येतो तर शाहरुखच्या विनोदबुद्धीची झलक पाहायला मिळते. आतापर्यंत शाहरुख आणि अनुष्का हे युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत होते. त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे हेच आतापर्यंतच्या ट्रेलरची खासियत होती. पण आता या ट्रेलरमध्ये अनुष्काने तिची अंगठी हरवलेली दिसत असून, अंगठी शोधण्यासाठी ती शाहरुखला भाग पाडते. तिच्या या वेंधळेपणाला शाहरुख पूर्ण वैतागलेला दिसतो.

अमेय वाघ- साजिरी देशपांडेच्या लग्नाचे फोटो

जेव्हा अनुष्काला कळतं की तिची अंगठी हरवली आहे तेव्हा ती अक्षरशः रडकुंडीला आलेली असते. ती आणि शाहरुख अंगठी शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा करताना या ट्रेलरमध्ये दिसते. या दरम्यान शाहरुखची चालू घडामोडीवर बोलण्याची विनोदबुद्धीही दिसते. या ट्रेलरची खासियत म्हणजे या दोघांची केमिस्ट्री. प्रत्येक ट्रेलरगणिक या दोघांमधील केमिस्ट्री जास्तच खुलून येताना दिसते. त्यामुळे येत्या ट्रेलरमध्ये त्यांची प्रेमकहाणी पाहायला मिळेल का याचीच उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

मुंबईतील नाईट क्लबमध्ये भेटणार शाहरूख आणि अनुष्का

सोशल मीडियावर शाहरुख- अनुष्काच्या याच मिनी ट्रेलरची चर्चा सध्या सुरू आहे. खूप दिवसांनंतर शाहरुख एका रोमॅण्टिक सिनेमात दिसणार आहे. सिनेमातले संवादही खूप हलके फुलके आहेत. या सिनेमाचे एकूण सात मिनी ट्रेलर असून त्यातले पाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहेत. लवकरच ‘जब हॅरी मेट सेजल’चे ‘बीच बीच मैं’ हे गाणंही प्रदर्शित होणार आहे. अनुष्का शर्मा या सिनेमात एका गुजराती मुलीची सेजलची भूमिका निभावतेय. ही सेजल युरोप फिरायला म्हणून गेलेली असते जिथे तिला ‘हॅरी’ म्हणजेच शाहरुख भेटतो. ४ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या