गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस चर्चेत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलीन फर्नांडिस ईडीच्या रडारवर सापडल्याने या चर्चा सुरु झाल्या होत्या. तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलीनची दिल्लीत ६ तास चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी जॅकलीनला २५ सप्टेंबर रोजी ईडीसमोर हजर रहावं लागणार लागणार होतं. मात्र जॅकलिन या चौकशीसाठी गैरहजर राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील ईडी कार्यालयात जॅकलिनने चौकशीसाठी हजर राहावं यासाठी तिला समन्स बजावण्यात आले होते. मात्र या चौकशीसाठी जॅकलिन गैरहजर राहिल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र या चौकशीसाठी जॅकलिनने पुढील तारीख बदलून मागितली होती का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गाडीभोवती गराडा घालणाऱ्या गरीब मुलांचं जॅकलिनने ‘असं’ जिंकलं मन; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

३० ऑगस्ट रोजी जॅकलीनची दिल्लीत ६ तास चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तिहार कारागृहातून २०० कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर स्वत:ची खरी ओळख न सांगता जॅकलिनला फोन करत असे. तो स्पूफिंगद्वारे तिहार जेलमधून जॅकलिनला फोन करत असल्याचे म्हटले जात आहे. त्याने जॅकलिनला काही महागाड्या भेटवस्तू देखील गिफ्ट म्हणून पाठवल्या होत्या. पण चौकशीदरम्यान जॅकलिनने तिला भेटवस्तू पाठवणारी आणि फोन करणारी व्यक्ती जेलमध्ये असल्याची कल्पना देखील नव्हती’, असे जॅकलिन म्हणाली होती.

जॅकलिन सध्या ‘भूत पोलिस’ या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जॅकलीनसोबत, यामी गौतम, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez did not appear for ed questioning in 200 crore extortion case kpw
First published on: 25-09-2021 at 18:32 IST