scorecardresearch

‘नाटू नाटू’ला Oscar मिळाल्याची जॅकलिन फर्नांडिसच्या मेकअप आर्टिस्टने उडवली खिल्ली; म्हणाला, “पैसे असतील तर काहीही…”

शान हा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्याने जॅकलिनच्या अनेक चित्रपटांमध्ये तिचा मेकअप केला आहे.

naatu-naatu-oscar-shaan
. ९५ व्या ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्या 'अप्लॉज' या गाण्यात जॅकलिन फर्नांडिसही होती.

९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताने दोन ऑस्कर पुरस्कार पटकावला. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा, तर आरआरआरच्या ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा अकादमी पुरस्कार मिळाला. पण काही जण ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्कर मिळावा, एवढंही चांगलं नाही, असं मानतात. याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर लोक दोन गटात विभागले गेले आहेत. अशातच मेकअप आर्टिस्ट शान मित्तथुलने गाण्यासाठी ऑस्कर विकत घेतला गेला, असं म्हटलं आहे.

Video: “नेलपेंट काढून नमाज पठण कर” म्हणणाऱ्या युजरवर संतापली राखी सावंत; म्हणाली, “मी इस्लाम धर्मात…”

मेकअप आर्टिस्ट आणि हेअर आर्टिस्ट शानने लिहिलं, “हा हा हा हा हे खूप मजेदार आहे. मला वाटायचं की फक्त भारतातच आपण पुरस्कार विकत घेऊ शकतो. पण आता ते ऑस्करमध्येही होत आहे. पैसे असतील तर काहीही विकत घेता येऊ शकतं, अगदी ऑस्करही.”

“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे…” रोहित शेट्टीने सांगितलेलं मराठी कलाकारांना चित्रपटांत घेण्यामागचं कारण

शान हा बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा मेकअप आर्टिस्ट आहे आणि त्याने जॅकलिनच्या अनेक चित्रपटांमध्ये तिचा मेकअप केला आहे. ९५ व्या ऑस्करमध्ये नामांकन मिळालेल्या ‘अप्लॉज’ या गाण्यात जॅकलिन फर्नांडिसही होती. या गाण्याला हरवत ‘नाटू नाटू’ने ऑस्कर जिंकला. शानने थेट जॅकलिनचे नाव किंवा गाण्याचे नाव घेतले नाही, पण त्याचा स्पष्ट रोख ‘नाटू नाटू’ गाण्यावर असल्याचं दिसत होतं.

प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर सुसाईड नोट शेअर केल्याने खळबळ; सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करत म्हणाली…

‘नाटू नाटू’ने ऑस्कर पुरस्कार जिंकत भारताचं नाव उंचावलं. हे गाणं ऑस्करच्या मंचावरही सादर करण्यात आले. या गाण्याला प्रेझेंट करण्यासाठी दीपिका पदुकोण पोहोचली होती. हे गाणं राहुल सिपलीगंज आणि काल भैरव यांनी गायले होतं. तसेच अमेरिकन डान्सर्सच्या एक ग्रूपने या गाण्यावर परफॉर्म केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 07:50 IST