सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना मारियासह इतर ६ जणांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून ७००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातील दाव्यानुसार, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कोट्यावधी रुपये खर्च केले होते. त्यावेळी जॅकलिन सुकेशला डेट करत होती, असेही बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी केली आहे.

pm modi in mamata banerjee turf
पंतप्रधान मोदी तीन वर्षांनंतर ममता बॅनर्जींच्या राज्यात, संदेशखाली प्रकरणावर बोलणार?
dombivli, akhil bhartiya brahman mahasangh
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
akola, Senior Civil Court, Defamation Suit, Dismisses, Intak Leader, bjp and shinde group, mla,
आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?
Former MP Nilesh Rane hotel has been sealed off by the Municipal Corporation Pune news
माजी खासदार नीलेश राणेंचे हॉटेल महापालिकेकडून लाखबंद; ३ कोटी ७७ लाखांचा मिळकतकर थकीत

दरम्यान यापूर्वी नोरा फतेहीने याबाबतचे एक निवेदन जारी केले होते की ती कोणत्याही प्रकारच्या मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेली नाही. त्याउलट मला स्वत:ला याचा फटका बसला आहे, असे तिने सांगितले होते. सुकेश चंद्रशेखर यांची पत्नी लीना मारिया हिच्या निमंत्रणावरून नोरा फतेही एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यानंतर त्यांना या कार्यक्रमात महागडी कार भेट देण्यात आली, असा दावा यात करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी २०० कोटी रुपयांच्या मनी लॉऩ्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून जॅकलिनची जवळपास ८ तास चौकशी झाली होती. २३ ऑक्टोबर रोजी सुकेश चंद्रशेखरचे वकील यांनी खुलासा केला होता की जॅकलीन तुरुंगात असलेल्या सुकेशसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण जॅकलिनने हे खोटे असल्याचे म्हटले होते. “जॅकलिन फर्नांडिसला ईडीने साक्षीदार म्हणून बोलावले आहे. तिने तिचे जबाब नोंदवले असून, ती या पुढेदेखील तपासकार्याला पूर्णपणे सहकार्य करेल,” असे जॅकलिनच्या वकिलाने म्हटले होते. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात ‘मद्रास कॅफे’ फेम अभिनेत्री लीना मारिया पॉललाही अटक करण्यात आली.