चित्रपटसृष्टीत कार्यरत राहाण्यासाठी दृढ निश्चय आणि यश प्राप्तीचे धेय या दोन महत्वपूर्ण बाबी असून, चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी नसलेल्यांसाठी तर हे अधिकच गरजेचे असल्याचे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे मानणे आहे. चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास खूपच कठीण राहिल्याचे या श्रीलंकन ब्युटीने कोणताही आडपडदा न ठेवता मान्य केले. २००९ साली अलादीन चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जॅकलिनचा अलिकडेच रॉय हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. केवळ हौसेपोटी चित्रपटात काम केल्याचे सांगत जॅकलिन म्हणाली, कालांतराने माझ्या लक्षात आले की, जर का याच क्षेत्रात मला कारकिर्द करायची असेल, तर मला संपूर्णपणे यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल, अन्यथा काहीसुध्दा हस्तगत करता येणार नही. जॅकलिनच्या मते, चित्रपटसृष्टीत कार्यरत राहाण्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. हे कठीण असून, जोपर्यंत आपण अशाप्रकारे काम करत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez survival in film industry is tough
First published on: 17-02-2015 at 02:36 IST