मल्याळी चित्रपट ‘जलम’ व भारतीय-ऑस्ट्रेलियन चित्रपट ‘सॉल्ट ब्रीज’ या दोन भारतीय चित्रपटांतील गीते मूळ गीतासाठी ऑस्कर नामांकनाच्या स्पर्धेत आहेत. ८८ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी १४ जानेवारीला नामांकने जाहीर केली जाणार आहेत, पुरस्कार समारंभ २८ फेब्रुवारीला होणार आहे.
जलम या चित्रपटात प्रियांका नायर हिची प्रमुख भूमिका असून त्यात एका शहरात राहणारी एकटीच विधवा मुलाला वाढवण्यासाठी कशी धडपडत असते हे दाखवले आहे. ती भूमिका तिने साकारली आहे.
या चित्रपटात भूमीयिलेनघनुमुंडो, कुडू वयक्कन, याथरा मनोरोधमेरूम व पकलपथी चारी ही एकूण चार गीते मूळ गीत या प्रवर्गात ऑस्कर नामांकन शर्यतीत आहेत.
राजीव खंडेलवाल आणि उषा जाधव यांच्या सॉल्ट ब्रीज या चित्रपटातील ‘आँखो में समाये दिल, बचपना था, काँपने लगे तुम क्या बताऊँ तुझे, ले जाये जो दूर तुमसे, ना जाने कितनी दूर व सूखा ही रंग डालो’ ही गीते नामांकन स्पर्धेत आहेत.
पाकिस्तानच्या दुखतर या चित्रपटातील या रहेम मौला मौला ही गीते स्पर्धेत असून त्यांना द विकएंडमधील अर्नड इट, एली गोल्डींगच्या फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे मधील लव्ह मी लाइक यू डू, फ्युरियस सेव्हनमधील सी यू अगेन, स्पेक्टरमधील रायटिंग ऑन द वॉल, यूथमधील सिंपल साँग हॅश ३ या गीतांचा सामना करावा लागणार आहे.