scorecardresearch

जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार ३’चा पहिला कट तब्बल ९ तासांचा; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मीडिया रीपोर्टनुसार जेम्स कॅमेरून यांनी ‘अवतार ३’चा पहिला कट तयार केला आहे

जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार ३’चा पहिला कट तब्बल ९ तासांचा; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
जेम्स कॅमेरून 'अवतार ३' (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

१६ डिसेंबरला बहुप्रतीक्षित ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणेच प्रेक्षकांनी याला उदंड प्रतिसाद दिला आहे. पहिल्या २ दिवसांतच या चित्रपटाने ८० कोटी कमाईचे आकडा पार केला असून लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याची शक्यता आहे. २००९ साली याचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता, पण तरी तब्बल १३ वर्षांनी आजही या चित्रपटासाठी लोक तितकेच उत्सुक आहेत.

याबरोबरच आता ‘अवतार ३’ची चर्चा जोर धरू लागली आहे. मीडिया रीपोर्टनुसार जेम्स कॅमेरून यांनी ‘अवतार ३’चा पहिला कट तयार केला आहे. एका पॉडकास्टमधून मिळालेल्या माहितीनुसार ’20th centuries studios’कडे जेम्स कॅमेरून यांनी ‘अवतार ३’चा पहिला कट सुपूर्त केला असून, तो कट तब्बल ९ तासांचा आहे. शिवाय या पूर्ण ९ तास लांबीच्या चित्रपटासाठी व्हीएफएक्सची मागणी जेम्स कॅमेरून यांनी केली आहे असं वृत्त समोर येत आहे.

आणखी वाचा : ‘Puma’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो पाहून अनुष्का शर्मा भडकली; म्हणाली, “कृपया ती पोस्ट…”

‘अवतार ३’च्या या कटमध्ये सध्या तरी कॅमेरून यांना काहीच बदल करायचे नसल्याचं म्हंटलं जात आहे. शिवाय या पूर्ण ९ तासाच्या चित्रपटाच्या व्हीएफएक्सच्या कामानंतर त्यातून नेमकं काय वगळायचं हे कॅमेरून ठरवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजूनतरी खुद्द जेम्स कॅमेरून यांनी या गोष्टीची पुष्टी केलेली नाही. पण या बातमीमुळे अवतारचे चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत.

‘अवतार’ आणि ‘टायटॅनिक’ या चित्रपटाबरोबरच जेम्स कॅमेरून यांनी प्रसिद्ध सीरिज ‘टर्मिनेटर’च्या पहिल्या २ भागांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय १९८६ साली ‘एलियन्स’ हा सायन्स फिक्शन हा चित्रपटही जेम्स कॅमरून यांनी काढला होता जो प्रचंड हीट ठरला. ‘अवतार’चे आणखीन ३ भाग येणार असल्याचीसुद्धा चर्चा आहे. तिसरा भाग ‘अवतार : द सिड बेअरेर’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे तर पुढचे २ भाग २०२६ आणि २०२८ या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 20:06 IST

संबंधित बातम्या