छोट्या पडद्यावर ‘धडक’णार जान्हवी- इशान

येत्या ३० सप्टेंबर रोजी टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे.

धडक

शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडला जान्हवी कपूर आणि इशान खट्टर ही नवी जोडी मिळाली. खरंतर या जोडीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच चाहत्यांच्या मनात एक स्थान निर्माण केलं होतं. त्यामुळे ‘धडक’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या याच प्रतिसादानंतर हा चित्रपट आता टीव्हीवर झळकण्यास सज्ज झाला आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या ‘धडक’ २० जुलै प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि बघता बघता लोकप्रिय ठरला. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसामध्ये जगभरामध्ये १०० कोटींची कमाई केल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबर रोजी टीव्हीवर दाखविण्यात येणार आहे.

३० सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता हा चित्रपट झी सिनेमा या वाहिनीवर प्रसारित होणार असल्याची माहिती चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ट्विट हॅण्डवरुन दिली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घरबसल्यादेखील घेऊ शकणार आहेत.

दरम्यान, हा चित्रपट नक्की पहा असं आवाहनही करणने यावेळी केलं आहे. ‘धडक’मुळे नावारुपाला आलेली जान्हवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी आहे. जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून तिच्या पदरामध्ये अनेक चित्रपट पडले असून ती करण जोहरच्या आगानी ‘तख्त’मध्येही झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Janhvi ishan dhadak movie release on zee cinema