जान्हवीचे मेकअप आर्टिस्टसोबत झाले कडाक्याचे भांडण, व्हिडीओ व्हायरल

जान्हवीने लवकरच ‘दोस्ताना २’ या चित्रपटात दिसणार आहे.

janhvi kapoor, janhvi kapoor fight with makeup artist,
जान्हवीने लवकरच 'दोस्ताना २' या चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीचे लाखो चाहते आहेत. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केल्या आहेत. जान्हवी या व्हिडीओत तिच्या मेकअप आर्टिस्टशी भांडताना दिसत आहे. मात्र, जान्हवी भांडत नसून ‘बिग बॉस ५’ मध्ये असलेली स्पर्धक पूजा मिश्रा आणि सोनाली निगरानी यांच्या भांडणाची नक्कल करते. हा व्हिडीओ शेअर करत “तुम्हाला काय वाटतं मला मदतीची गरज आहे?”, असे कॅप्शन जान्हवीने दिले आहे. हा व्हिडीओ ७ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…

आणखी वाचा : एकट्या ऐश्वर्याने ३० लोकांना वाढले होते जेवण, विशाल दादलानीने सांगितला किस्सा

नुकताच जान्हवीने ‘मिली’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. या चित्रपटातून जान्हवी पहिल्यांदा बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन कंपनीतून काम करणार आहे. दरम्यान, जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता जान्हवी ‘दोस्ताना २’ या चित्रपटात दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Janhvi kapoor share a video fight with her makeup artist dcp

Next Story
“न्यूयॉर्क तो चले गए, बन ना पाए नवाब”, एमी पुरस्कार न मिळाल्याने नवाजुद्दीने व्यक्त केल्या भावना
फोटो गॅलरी