बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीचे लाखो चाहते आहेत. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जान्हवी तिच्या अक्सा गँगसोबत दिसत आहे. या व्हिडीओत जान्हवी आणि तिचे मित्र ‘कयामत’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा विनोदी व्हिडीओ शेअर करत अक्सा गँग सुखरूप आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘हा आमचा शेवटचा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करत आहोत’, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदा दिसणार ‘या’ कार्यक्रमात?
या आधीही जान्हवीने तिच्या अक्सा गॅंगसोबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे ते व्हिडीओ ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. जान्हवीचा टेम्प्रेचर या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
आणखी वाचा : छोट्या पडद्यावरील ही बोल्ड अभिनेत्री चक्क विकतेय मासे?
दरम्यान, जान्हवीने भाऊ अर्जुन कपूरसोबत एका मॅग्झिन कव्हरसाठी नुकतेच एक फोटोशूट केले आहे. जान्हवीने २०१८ मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’मध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटामुळे जान्हवीला खरी लोकप्रियता मिळाली होती. तर आता जान्हवी ‘गुड लक जेरी’ आणि ‘दोस्ताना २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
