Jani Master: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरला पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक केली. जानी मास्टर असं या कोरिओग्राफरचं नाव आहे. टॉलिवूड म्हणजेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला तो प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. त्याच्या विरोधात काही दिवसांपूर्वी २१ वर्षीय मुलीने लैंगिक शोषणची तक्रार नोंदवली होती. आता याच जानी मास्टरला ( Jani Master ) अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंगळुरु पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जानी मास्टर हा टॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आहे.

१६ सप्टेंबरला पीडितेची तक्रार

१६ सप्टेंबरला जानी मास्टर ( Jani Master ) या कोरिओग्राफरच्या विरोधात २१ वर्षीय महिलेने तक्रार केली. जानी मास्टरने लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेने केला. या महिलने तक्रारीत म्हटलं आहे की जानी मास्टर मागची सहा वर्षांपासून तिचं शोषण करत होता. आऊट डोअर शुटिंगला गेलो असताना, घरी बोलवून, जवळपासच्या शहरांमध्ये नेऊन जानी मास्टरने ( Jani Master ) शोषण केलं असा आरोप या महिलेने केला आहे.

Dhruvi Patel Miss India Worldwide 2024
Dhruvi Patel : अमेरिकेतील भारतीय वंशाची ध्रुवी पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४, पाहा Photos
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Who is IPS Shivdeep Lande why he is resign
IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?

हे पण वाचा- नालासोपार्‍यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना, चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

महिलेचं शोषण सुरु झालं तेव्हा ती अल्पवयीन होती त्यामुळे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणातच पॉक्सो कायद्यातंर्गत जॉनी मास्टर ( Jani Master ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कारण जेव्हा महिलेचं शोषण सुरु झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. आता या प्रकरणात जानी मास्टरची चौकशी पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे. जानी मास्टरच्या विरोधात कलम ३७६ (२), ३२३, कलम ५०६ या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की तक्रार करणाऱ्या महिलेचं शोषण जानी मास्टरने तेव्हापासून सुरु केलं जेव्हापासून ती अल्पवयीन होती. त्यामुळे आता राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफरच्या अडचणी वाढल्या आहेत.

जानी मास्टर कोण आहे?

जानी मास्टर ( Jani Master ) हा टॉलिवूडचा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आहे. जेलर या सिनेमातलं कावाला हे गाणं त्याने कोरिग्राफ केलं आहे.जानी मास्टरने या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलं आहे. तसंच अनेक चित्रपटही त्याने सोडले आहेत. या कोरिओग्राफरने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमधली गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

पीडितेने ४० पानं लिहित सांगितली आपबिती

पोलिसांनी या प्रकरणात पीडितेची तक्रार नोंदवली त्याबाबत असंही सांगितलं आहे की तिने ४० पानं लिहित तिची आपबिती सांगितली आहे. राज्य महिला आयोगाला ४० पानं सोपवण्यात आली आहेत. यामध्ये पीडितेने पुराव्यांसह काय काय घडलं ते सांगितलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामुळे जानी मास्टरच्या अडचणी वाढल्या आहेत.