scorecardresearch

जान्हवीचे तीनपदरी मंगळसूत्र इबे डॉट इनवर!

जान्हवीच्या तीनपदरी मंगळसूत्राने तर बहुतेक महिलांना वेड लावले आहे.

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये फार प्रसिद्ध झाली आहे. त्यातून या मालिकेतील जान्हवीच्या तीनपदरी मंगळसूत्राने तर बहुतेक महिलांना वेड लावले आहे. तिने घातलेल्या या मंगळसूत्राची बाजारात मागणीही वाढत आहे. पण, काहीजणींना ते मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या मंगळसूत्रासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. घरबसल्या ebay.in या संकेतस्थळावर हे मंगळसूत्र केवळ १९९ रुपयांना विकत घेता येऊ शकते. “Janvi Pattern Gold Plated 3 Line Mangalsutra”  म्हणून शोधल्यास तुम्हाला हे मंगळसूत्र मिळू शकते.

श्री -जान्हवीचे शुभमंगल!

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या