शबाना आझमी यांना मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला होता. या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. परिणामी त्यांना उपचारांसाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर १४ दिवसांच्या उपचारानंतर शबाना आझमी पूर्णत: बऱ्या झाल्या आहेत. त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शबाना आझमी यांची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले. “शबाना आता पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. येत्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सूटी मिळणार आहे.” असे जावेद अख्तर या मुलाखतीत म्हणाले.

एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. कारमध्ये चालक, शबाना आझमी यांच्यासोबत जावेद अख्तरसुद्धा होते. कारचा चालकसुद्धा जखमी झाला होता. तर जावेद अख्तर यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अपघातात आझमी यांच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शबाना आझमी यांच्या नाक आणि तोंडाला मार लागला होता. दुपारी चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Javed akhtar reveals shabana azmi has completely recovered mppg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या