शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटात होणार विजय सेतुपतीची एण्ट्री, ‘या’ अभिनेत्याची घेणार जागा

शाहरुखचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

jawan shahrukh khan vijay sethupathi
शाहरुखचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून शाहरुखच्या मोठ्या पडद्यावर पुनरागमनाची वाट पाहत आहेत. शाहरुख गेली चार वर्षे कोणत्याही चित्रपटात दिसला नाही, पण आता शाहरुखने बॅक टू बॅक चित्रपटांची घोषणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तर शाहरुखच्या आगामी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जवान’. या चित्रपटाची घोषण झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा शाहरुखसोबत दिसणार आहे. तर आता या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीची एण्ट्री होणार आहे.

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

तामिळ दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा, राणा दग्गुबती आणि सुनील ग्रोव्हर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, मिळालेल्या रिपोर्टनुसार, या चित्रपटात राणा डग्गुबतीच्या जागी विजय सेतुपतीने दिसणार आहे. ‘जवान’च्या निर्मात्यांनी सुरुवातीला ‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबतीशी संपर्क साधला होता. मात्र तारखा मिळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : “संजय राऊत यांची कॉमेंट्री…”, आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत

पाहा पोस्ट

आणखी वाचा : “जोपर्यंत तुम्ही दिघेसाहेब म्हणून समोर आहात, तोपर्यंत…”; प्रसाद ओकने सांगितला सेटवरील ‘तो’ किस्सा

या चित्रपटात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांची मोठी स्टार कास्ट पाहता चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. आता या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत विजय सेतुपतीची एण्ट्री होणार असल्याच्या चर्चांमुळे चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या शिवाय अशाही चर्चा आहेत ही या चित्रपट थलपथी विजय पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : विमानतळावर दिसले करण जोहरच्या मुलांचे संस्कार, पाहा व्हिडीओ

दरम्यान, विजय सेतुपती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विक्रम या चित्रपटात दिसला. हा चित्रपट कमल हासन यांचा होता. यासोबतच अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रुल’ या चित्रपटात विजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jawan shahrukh khans upcoming pan india film vijay sethupathi replaces this actor dcp

Next Story
Birthday Special: अभिनय क्षेत्रात येण्याआधी काय करायची श्वेता त्रिपाठी?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी