‘बिग बॉस १५’ शोमधील जय भानुशालीच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस १५’मधील स्पर्धक जय भानुशाली सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जय सध्या कुटुंबापासून दूर बिग बॉसच्या घरात सहभागी झालाय. दरम्यान जय सर्वात जास्त आपल्या मुलीला म्हणजेच ताराला मिस करत आहे. शोमध्ये जाण्यापूर्वी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय होता. यावेळी तो अनेकदा आपल्या लाडक्या लेकीसोबतचे क्यूट व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करायचा. जयच्या मुलीच्या क्यूट […]

jay-bhaushali-daughter
(Photo-Instagram@ijaybhanushali)

‘बिग बॉस १५’मधील स्पर्धक जय भानुशाली सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जय सध्या कुटुंबापासून दूर बिग बॉसच्या घरात सहभागी झालाय. दरम्यान जय सर्वात जास्त आपल्या मुलीला म्हणजेच ताराला मिस करत आहे. शोमध्ये जाण्यापूर्वी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय होता. यावेळी तो अनेकदा आपल्या लाडक्या लेकीसोबतचे क्यूट व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करायचा. जयच्या मुलीच्या क्यूट व्हिडीओंना चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळत होती. बिग बॉसच्या घरातही जय मुलीला मिस करत असल्याचं पाहायला मिळतंय

तर दुसरीकडे जयची मुलगी तारादेखील त्याला खूप मिस करत आहे. जयची पत्नी माही वीजने नुकताच ताराचा एक व्हिीडओ शेअर केलाय. यात ती वडिलांना मिस करताना दिसत आहे. माहीने शेअर केलेल्या व्हिडीओत तारा एका बाहुलीसोबत खेळताना दिसतेय. माहीने तारा “तुझ्या वडिलांचं नाव काय? असं विचारलं असता तारा तिच्या बोबड्या बोलात “जय भानुशाली” असं म्हणत आहे. तर घरीतील टीव्हीवर सुरु असलेल्या बिग बॉस शोकडे इशारा करत जय तिथे असल्याचं ती सांगत आहे.

आर्यन खानच्या जॅकेटवरील ड्रग्ज संबंधित संदेश वाचून व्हाल थक्क, अटक होण्यापूर्वीच झाला होता स्पॉट


हा व्हिडीओ शेअऱ करत माही वीजने कॅप्शनमध्ये लिहिलं, “तारा म्हणतेय जय भानुशाली बिग बॉस”. माहीने शेअर केलेल्या ताराच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात झालेल्या भांडणामुळे जयने राग अनावर झाल्याने शिवीगाळ केली होती. यामुळे त्याला प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jay bhanushali daughter tara cute video goes viral kpw

ताज्या बातम्या