जय भानुशालीने ‘तो’ फोटो शेअर केल्याने पत्नी माही नाराज, सोशल मीडियावर केलं ब्लॉक

जयने आता माहीची मनधरणी करण्यासाठी चाहत्यांची मदत मागितली आहे.

jai-bhanushali-mahi-vij
(Photo-Instagram@ijaybhanushali)

जय भानुशाली आणि माही वीज हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. जय आणि माहीच्या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळताना दिसते. जय आणि माही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या लाडक्या लेकीसोबकते अनेक फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र जयने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे माही त्याच्यावर चांगलीच नाराज झाली आहे. या फोटोमुळे माही एवढची नाराज झाली की तिने जयला थेट इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलंय.

माहीने जयला इन्स्टाग्रामवर ब्लॉग केल्यानंतर जयने आता माहीची मनधरणी करण्यासाठी चाहत्यांची मदत मागितली आहे. खरं तर एका फोटोमुळे माही जयवर नाराज झालीय. जयने नुकताच माही आणि मुलीसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटेच्या कॅप्शनाला त्याने ‘फॅमिली’ असं कॅप्शन दिलं होतं. मात्र या फोटो माहीला आवडला नाही.

हे देखील वाचा: जावेद अख्तर यांना ट्रोल करणाऱ्यांना शबाना आझमींनी दिलं ‘हे’ उत्तर, शशी थरूर यांच्या गाण्यावर केली होती कमेंट

जयने त्याच्या इन्स्टास्टोरीला काही व्हीडीओ शेअर करत संपूर्ण किस्सा सांगितला आहे. यात जयने शेअर केलेला फोटो माहीला आवडला नसल्याने तिने त्याला ब्लॉग केल्याचं त्याने सांगितलंय. तर माहीदेखील या व्हिडीओत जयवर चांगलीच चिडलेली दिसतेय. “ज्या फोटोत मी चांगली दिसत नाही असेच तू शेअर करतोस” असं ती चिडून म्हणतेय. तर हा फोटो चांगला असून कुणीच यावर वाईट कमेंट केलेली नाही असं जय म्हणतोय

 

View this post on Instagram

 

A post shared by Jay Bhanushali (@ijaybhanushali)

यानंतर जयने या व्हिडीओमध्ये पतीच्या हातून चूक झाली तर काय घडतं ते चाहत्यांना सांगितलं आहे. “हेच जर मी माहीला ब्लॉक केलं असतं तर मला खूप काही ऐकावं लागलं असतं. तुझं माझ्यावर प्रेम नाही वैगरे.” तर पुढे जयने चाहत्यांकडे मदत मागितली आहे. “माहीला मेसेज करून मला अनब्लॉक करायला सांगा प्लीज” अशी विनंती जयने केलीय.

हे देखील वाचा: जेव्हा आशा भोसले यांनी आर डी बर्मन यांच्या लग्नाच्या प्रपोजलला दिला होता नकार!

(Photo-Instagram@ijaybhanushali)

तर अनेक नेटकऱ्यांनी जयला अनब्लॉक करण्याची विनंती केलीय. “माही दीदी प्लीज जयला अनब्लॉक कर…तो खूप क्यूट आहे.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “एवढ्या क्यूट मुलाला तू कसं ब्लॉक करू शकतेस” असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी माहीला तिने जयला अनब्लॉक करण्याची मागणी केलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jay bhanushali share video for fans help as wife mahi vij block him on instagram kpw

ताज्या बातम्या