जया बच्चन यांचे डिजिटल विश्वात पदार्पण, ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार

अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ जया बच्चन यांचे डिजिट विश्वात पदार्पण

Jaya Bachchan, sadabahar, sadabahar digital debut, sadabahar web series, सदाबहार, जया बच्चन,
जवळपास ५ वर्षांनंतर जया बच्चन या प्रेक्षकांना स्क्रीनवर पाहायला मिळणार आहेत.

बच्चन कुटुंबीय हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी पर्सनल लाइफमुळे. आता सध्या जया बच्चन या चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ त्या डिजिटल विश्वात पदार्पण करत आहेत. त्या एका वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहेत.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, जया बच्चन या लवकरच ‘सदाबहार’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. या सीरिजचे त्यांनी फ्रेब्रुवारी महिन्यात चित्रीकरण देखील सुरु केले आहे. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रीकरण थांबवण्यात आले. आता सर्व पुन्हा सुरु झाल्यामुळे त्यांनी चित्रीकरणास पुन्हा सुरुवात केली आहे.

आणखी वाचा : ‘समांतर २’मध्ये सई ताम्हणकरचा डबल रोल? नवा प्रोमो प्रदर्शित

दरम्यान जया बच्चन किंवा सीरिजच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जया बच्चन या ‘सदाबहार’ या सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. जवळपास ५ वर्षांनंतर जया बच्चन या प्रेक्षकांना स्क्रीनवर पाहायला मिळणार आहेत. त्या २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘की और का’ या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीमध्ये फारश्या सक्रिय नव्हत्या.

यापूर्वी अभिषेक बच्चनचा चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो-सिताबो’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता जया बच्चन ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत असल्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jaya bachchan is ready to make her digital debut avb

ताज्या बातम्या