scorecardresearch

Video : “या लोकांना…” जया बच्चन पुन्हा एकदा फोटोग्राफर्सवर संतापल्या

त्या व्यक्तीला फोटो काढताना पाहिल्यानंतर जया बच्चन संतापल्या.

Video : “या लोकांना…” जया बच्चन पुन्हा एकदा फोटोग्राफर्सवर संतापल्या
जया बच्चन

अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या अभिनयाबरोबर रागीट स्वभावासाठी ओळखले जाते. त्या सातत्याने चिडचिड करताना, पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना अनेकदा फटकारताना दिसतात. आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्या पुन्हा एकदा फोटो काढणाऱ्यांवर संतापल्याचे दिसत आहेत. यावेळी त्यांनी त्याला फटकारल्याचेही दिसत आहे.

जया बच्चन या त्यांचे पती अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर इंदौरला गेल्या होत्या. यावेळी विमानतळावर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओत जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी एक व्यक्ती जया बच्चन यांचे फोटो-व्हिडीओ काढत होता. त्या व्यक्तीला फोटो काढताना पाहिल्यानंतर जया बच्चन संतापल्या.
आणखी वाचा : “तुम्ही मोठ्या आहात म्हणून…” जया बच्चन यांचं ‘ते’ कृत्य पाहून उर्फी जावेद भडकली

यावेळी जया बच्चन यांनी ‘कृपया माझे फोटो काढू नका’, असे दोनदा रागात त्या व्यक्तीला सुनावले. मात्र त्या व्यक्तीने कॅमेरा सुरु ठेवल्याने त्या चांगल्याच संतापल्या. ‘तुम्हाला इंग्रजी कळत नाही का?’ अशा शब्दात जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला.

यानंतर त्यांच्या एक व्यक्ती व्हिडीओ काढणाऱ्या त्या व्यक्तीला बाजूला करते आणि ती व्यक्ती, ‘तुला व्हिडीओ काढू नको असं सांगितलं होतं ना’, असे त्याला सांगताना दिसते. याच दरम्यान जया बच्चन यांचा आवाज देतात आणि म्हणतात, ‘या अशा लोकांना नोकरीवरुन काढून टाकायला हवं’, असे जया बच्चन यावेळी म्हणतात.

आणखी वाचा : चिन्मय मांडलेकरचा ‘राजे’ उल्लेख करत हरीष दुधाडेची खास पोस्ट, म्हणाला “मी तुमच्याबरोबर…”

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधीही जया बच्चन यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. यावरुन त्यांना ट्रोलही केले जाते. पण त्यांच्या स्वभावात कोणताही बदल झालेला नाही.

दरम्यान त्या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 19:46 IST

संबंधित बातम्या