साखरपुडा मोडून १७ वर्षे झाली, तरी जेनिफर लोपेझ घालते तिच अंगठी

जेनिफर आणि बेन अफ्लेक यांची पहिली भेट ही २००२ मध्ये ‘गिगली’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

jennifer-lopez, jennifer-lopez-birthday-special
जेनिफर आणि बेन अफ्लेक यांची पहिली भेट ही २००२ मध्ये झाली होती.

हॉलिवूडची लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्रई जेनिफर लोपेझ आहे. आज २४ जुलै जेनिफरचा वाढदिवस आहे. आज जेनिफर तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. जेनिफर ही तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत राहते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण काही गोष्टी जाणून घेऊया. जेनिफर आणि बेसबॉलपटू अॅलेक्स रोड्रिग्ज यांचा ब्रेकअप झाला. या दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर जेनिफर पुन्हा एकदा तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर बेन अफ्लेकसोबत दिसली. सध्या ब्रेकअप नंतर लगेच जेनिफर त्याच्यासोबत दिसल्याने सगळीकडे यावर चर्चा सुरु आहे.

हॅरी विन्सटनची ६.१ कॅरेटची पिंक सोलिटेयर कस्टम मेड अंगठी देत बेनने जेनिफरला प्रपोज केलं होतं. त्यानंतर बेन आणि जेनिफर यांचा २००२ मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतर एका वर्षातच म्हणजेच २००३ मध्ये त्या दोघांचा ब्रेकअप झाला. आता, अॅलेक्ससोबत ब्रेकअप झाल्यानंतर बेन आणि जेनिफर एकत्र आल्याने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कारण हे दोघं जवळपास १७ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Lopez (@jlo)

आणखी वाचा : “ही त्याच्या कर्मांची शिक्षा,” पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला आणखी एक धक्का

जेनिफरकडे बेन अफ्लेकने दिलेली अंगठी अजूनही आहे. जेनिफरच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, तिच्याकडे अजूनही हॅरी विन्सटनची ६.१ कॅरेटची हिऱ्याची अंगठी आहे, जी बेनने तिला दिली होती. या अंगठीची मूळ किंमत १२ लाख डॉलर एवढी आहे. साखरपुडा मोडल्यानंतरही जेनिफरने ही अंगठी परत केली नव्हती, असे वृत्त फॉक्स न्यूजने प्रसिद्ध केल्याने वृत्त एका मीडिया रिपोर्टने दिले आहे.

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”

जेनिफरचे माजी पीआर रॉब शटर यांनी सांगितल्यानुसार, जेनिफरने ती अंगठी कधीच परत केली नाही. आणि जर त्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी ठिक झाल्या तर ते पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. दरम्यान, जेनिफरकडे आधीपासूनच बेनने दिलेली अंगठी आहे. जेनिफर आणि बेनची पहिली भेट २००२ मध्ये ‘गिगली’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jennifer lopez birthday special she still have engagement ring given by ben affleck dcp

ताज्या बातम्या