लोकप्रिय ज्वेलरी डिझायनर आणि सुझान खानची बहीण फराह अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ती वेगवेगळ्या गोष्टींवर तिचं मत मांडताना दिसते. फराह अली खाननं यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का? असा प्रश्न तिने विचारला आहे. त्यावर दिग्दर्शक अशोक पंडित यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
tejasvi surya marathi news, tejasvi surya nagpur marathi news
“मोदींमुळे बेरोजगार झालेल्या काँग्रेस नेत्यांकडूनच बेरोजगारीवर बोंबाबोंब”, तेजस्वी सूर्या म्हणाले…
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
maryam nawaz pakistan s first woman chief minister maryam nawaz sharif in pakistani
विश्लेषण : मरियम नवाझ शरीफ.. बेनझीर भुत्तोंनंतर पाकिस्तानी राजकारणाची दिशा बदलणारी दुसरी महिला!

फराहचे ट्वीट पाहिल्यानंतर दिग्दर्शक अशोक पंडित म्हणाले, “तुम्ही मुस्लिमांच्या मागे लपलेल्या शहरी नक्षलवादी आहात. त्यामुळं मुस्लिमांच्या वतीनं बोलू नका. तुमचं आडनाव खान आहे, म्हणून तुम्ही मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. भारतीय पंतप्रधानांना पाठिंबा देतात.”

आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम

काय म्हणाली होती फराह अली खान?

फराहने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये फराह म्हणाली, “प्रिय नरेंद्र मोदी, तुम्ही आणि भाजपा पक्ष वास्तवात मुस्लिमांना भारतातला एक भाग मानता का? जर तुम्ही मानत असते तर ३० लाख मुस्लिमांनी तुम्हाला समर्थन दिलं असतं. त्यांच्यात फूट पाडून तुम्ही त्यांचा विश्वास हरवून बसला आहातच, शिवाय देशाचं विभाजनही करत आहात. तुम्ही म्हणता, सबका साथ सबका विकास, याचा नक्की अर्थ काय?”

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…

पुढे फराहने आणखी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये फराह म्हणाली, ‘मी हे विचारते कारण जेव्हा तुम्ही २०१४मध्ये सत्तेत आला होतात, तेव्हा मला वाटलेलं तुम्ही बदल घडवणार. तुम्ही जेव्हा म्हणालात, सबका साथ, सबका विकास, तेव्हा वाटलं सर्व भारतीयांबद्दल आहे. मी जन्मानं भारतीय आहे आणि माझे पूर्वजही. भारत जितकी माझी मातृभूमी आहे, तितकीच इथे जन्मलेल्या सर्व मुस्लिमांची आहे.’

आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्याचा अक्षय कुमारला बसला फटका, ‘धूम ४’ मधून अक्कीचा पत्ता कट?

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का?

आणखी वाचा : एका आईसाठी सगळ्यात अवघड काय असतं? निवेदिता सराफ यांची पोस्ट चर्चेत

आणखी एक ट्वीट करत फराह फाळणीबद्दल म्हणाली, “माझे पूर्वज फाळणीच्या विरोधात होते. त्यांनी भारतात राहणं पसंत केलं. कारण आपल्या महान बहुसांस्कृतिक देशावर त्यांचा विश्वास होता. मी तुम्हाला धर्मांमध्ये सुरू असलेला तिरस्कार थांबवण्याची विनंती करते. कारण आपण विभागले गेलो, तर खाली पडू. एकजुटीनंच आपण ताठ उभे राहू शकतो.”