‘या’ ठिकाणी करायचय जान्हवी कपूरला लग्न, असा आहे प्लॅन

लग्नात जान्हवी तिच्या आवडीचे दाक्षिणात्य पदार्थ ठेवणार आहे

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी मुलगी जान्हवी कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या जीमच्या कपड्यांवरुन चर्चा असतात तर कधी तिच्या चित्रपटातील लूकच्या. सध्या जान्हवी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. जान्हवीच्या या चर्चा एका मुलाखती दरम्यान तिने स्वत:च्या लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुरु झाल्या आहेत.

नुकताच जान्हवीने फॅशन मॅग्झीन ब्रायडल टुडेसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवीने तिच्या खाजगी आयुष्यातील काही गुपिते उघड केली आहेत. तिला कुठे लग्न करायचे आहे? लग्नात ती काय घालणार? कोणते पदार्थ असणार याचा खुलासा केला तिने केला आहे.

 

View this post on Instagram

 

#Repost @bridestodayin (@get_repost) ・・・ Unexpected hues and playful drapes transform our September cover star Janhvi Kapoor (@janhvikapoor) into a new-age cocktail bride. Guest Edited by Shantanu and Nikhil. (@shantanunikhil) All clothes & gloves: @shantanunikhil Jewellery: @om_jewellers Editor: Nonita Kalra (@nonitakalra) Photographs by Tarun Khiwal (#tarun_khiwal) Fashion director: Mohan Neelakantan (@mohanneelakantan) Fashion Editor: Smridhi Sibal (@smridhisibal) Fashion assistant: Shruti Joshi (@shrutijoshi21) Hair: Priyanka Borkar (@priyanka.s.borkar) Makeup: Sonic Sarwate (@sonicsmakeup) for MAC (@maccosmeticsindia) Shoes: Christian Louboutin @louboutinworld Digital Consultant: Ravneet Kaur Sethi (@ravneetkaurr) Production: P Productions (@p.productions_) Actor’s PR agency: Hype PR (@hypenq_pr) #BridesTodayIn #JanhviKapoor

A post shared by Mohan Neelakantan (@mohanneelakantan) on

‘माझे लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे आणि तेही तिरुपती येथे होणार आहे. मी माझ्या लग्नात कांजीवरम जरीची साडी नेसणार आहे. याशिवाय माझ्या लग्नात माझ्या आवडीचे दाक्षिणात्य पदार्थ इडली-सांभर, दही-भात आणि खीर असणार आहेत’ असे जान्हवी म्हणाली.

आणखी वाचा : संजूबाबा पडला पूजाच्या प्रेमात, बॉलिवूडमध्ये चर्चा

त्यानंतर जान्हवीने लग्न कशा पद्धतीने असावे याचा खुलासा केला आहे. ‘मला लग्न धूमधडाक्यात आणि आधुनिक पद्धतीने करायचे नाही. माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्ती तेथे उपस्थीत असायला हव्यात’ असे जान्हवी म्हणाली. दरम्यान जान्हवीने तिची आई, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या विषयी काही गोष्टींचा खुलासा केला. ‘माझ्या आईला माझी पुरुषांची निवड कधीच आवडत नव्हती. तिला माझ्यासाठी मुलगा शोधायचा होता. कारण मी कोणत्याही मुलाच्या लगेच प्रेमात पडते’ असे पुढे जान्हवी म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jhanvi kapoor wants to get married at this place avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या