scorecardresearch

अमिताभ यांच्या ‘झुंड’ चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य

अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.

jhund, kapil sharma, amitabh bachchan, nagraj manjule,
अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.

कॉमेडी किंग म्हणून ओळख असलेला कपिल शर्मा हा बऱ्याचवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतो. कपिल सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. पण यावेळी कपिलने त्याच्या शोमध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील कलाकार किंवा त्यांच्या संपूर्ण टीमला आमंत्रन दिले नाही असा आरोप चाहत्यांनी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात ग्लॅमरस चेहरा नाही म्हणून कपिलने या टीमला आमंत्रण दिले नाही. या वादानंतर सोशल मीडियावर कपिल शर्मा शो ट्रेंड होतं असून प्रेक्षक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पण यासगळ्यात निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी कपिलला पाठिंबा दिला आहे.

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत सविता या विषयी म्हणाल्या, “आमच्या चित्रपटाचे प्रमोशन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झाले. तोपर्यंत कपिल शर्मा एका आठवड्यासाठी वैयक्तिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी परदेशात निघून गेला होता. कपिल तिथून आला, त्यानंतर आम्ही पुन्हा शोमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ शकलो नाही. शोमध्ये न जाण्यामागे हेच खरे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ची टीम फक्त बिग बजेट चित्रपट किंवा स्टार कास्टसोबत शो करते असे काही नाही.”

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

‘झुंड’ या चित्रपटाच्या व्यतिरिक्त विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकारांवर कपिल शर्मा शोमध्ये २५ लाख रुपय घेऊन आमंत्रित केल्याचा आरोप कपिलवर केला आहे. या विधानावर विवेक अग्निहोत्री अजूनही ठाम आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी कपिल शर्माने ट्वीट करून ही एकतर्फी कथा असल्याचे म्हटले होते. मात्र, या प्रकरणी वाहिनीकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

आणखी वाचा : “घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेसमुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jhunds producer savita raj defended kapil sharma on controversy about the movie dcp