तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका विशिष्ट आदिवासी समुहावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. याशिवाय आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे. दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ‘जय भीम’ चित्रपट पाहिल्यानंतर मनापासून अस्वस्थ झाल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर…, असा प्रश्न पडल्याचे आव्हाड म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला आठवत नाही कि मी माझ्या भाषणाच्या शेवटी जय भीम कधी म्हणायला लागलो. ही घोषणा एका जातीशी संबंधीत नसून ते एक उर्जास्त्रोत आहे. जे तुम्हांला अन्यायाविरुद्ध, स्वाभीमानासाठी, स्वत्वासाठी उभे राहायला मदत करते, ताकद देते. आजही आपण पूर्णपणे जातीभेदाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेलो नाही.” जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटातील कलाकारांचे देखील कौतुक केले आहे. 

अनेक अभिनेत्यांनी देखील या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेता नानीने ट्विट करत म्हटलं, “मी आत्ताच जय भीम चित्रपट पाहिला. सूर्या शिवकुमार सर यांच्या बद्दलचा आदर खूप वाढला. याशिवाय सेनगानी आणि राजाकन्नू या पात्रांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्यांचं कौतुक. हा अप्रतिम चित्रपट दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार.”

चित्रपट निर्माते व्यंकट प्रभू यांनीही हा चित्रपटा पाहून प्रतिक्रिया दिली. “नुकताच अमेझॉन प्राईमवर जय भीम चित्रपट पाहिला. अप्रतिम. चित्रपटाचं लेखन, निर्मिती, अभिनय सर्वच उत्तम झालंय. या चित्रपटासाठी सूर्या शिवकुमारसह टीमचे आभार.”

हेही वाचा – ‘जय भीम’ चित्रपटात सूर्याने साकारलेली व्यक्तिरेखा ‘जस्टिस चंद्रू’ कोण आहेत? जाणून घ्या…

राजदचे आमदार प्रह्लाद यादव यांनी जय भीम चित्रपटावर ट्वीट करत म्हटलं, “जय भीम चित्रपटाने आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन मिळवलं आहे. हा चित्रपट १९९३ मधील कुडलोर घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ९.८ रेटिंग मिळालं आहे. चित्रपट निर्मात्या टीमचं अभिनंदन. जय भीम हा उत्कृष्ट चित्रपट आहे. दाक्षिणात्य सिनेमांना अधिक ताकद मिळो.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction after watching the movie jai bhim dr babasaheb ambedkar srk
First published on: 09-11-2021 at 12:53 IST