ज्युरी हेड लॅपिड यांचे जितेंद्र आव्हाडांकडून समर्थन, म्हणाले, "मुस्लीमविरोधी काश्मीर फाईल्स..." | jitendra awhad supports iffi jury head nadav lapid for criticizing kashmir files film | Loksatta

‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरील नव्या वादात जितेंद्र आव्हाड यांची उडी, म्हणाले “मुस्लीमविरोधी काश्मीर फाईल्स…”

इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी‘काश्मीर फाईल्स’या चित्रपटाबाबत केलेल्या विधानावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरील नव्या वादात जितेंद्र आव्हाड यांची उडी, म्हणाले “मुस्लीमविरोधी काश्मीर फाईल्स…”
जितेंद्र आव्हाड आणि काश्मीर फाईल्स (फोटो- ट्विटर)

इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी‘काश्मीर फाईल्स’या चित्रपटाबाबत केलेल्या विधानावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काश्मीर फाईल्स हा चित्रपट व्हल्गर आणि प्रचारकी असल्याचे लॅपिड जाहीरपणे म्हणाले आहेत. ते गोव्यात आयोजित केलेल्या ५३ व्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलत होते. लॅपिड यांच्या या विधानाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तर अनेकांनी लॅपिड यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या प्रकरणावर ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. लॅपिड यांनी या चित्रपटाला प्रचारकी आणि गलिच्छ म्हणत चांगलीच चपराक लावली आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.

हेही वाचा >> चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, म्हणाल्या “असे कितीही आडवे आले तरी…”

“तो इस्रायली असल्याने मुस्लीमविरोधी ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपट चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदव लॅपिड यांनी सणसणीत चपराक लगावली,” अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

इफ्फीचे ज्युरी हेड नेमकं काय म्हणाले?

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं ते म्हणाले.

हेही वाचा >> IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”

दरम्यान, नदव लॅपिड यांनी केलेल्या विधानानंतर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटात अभिनय केलेल्या ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी लॅपिड यांच्या मताशी असहमती दर्शवली आहे. असत्य कितीही उंच आणि मोठे असले, तरी ते सत्याच्या तुलनेत छोटेच असते, असे अनुपम खेर म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 11:05 IST
Next Story
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांचा शिमला-मनालीमध्ये लेकीसह भन्नाट डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…