आजीच्या निधनानंतर जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, “उसके साथ मेरे बीते हुए दिन है”

आजीच्या आठवणीत कविता

अभिनेता जितेंद्र जोशीने आजवर अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय. मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. मालिका, नाटक, चित्रपट किंवा वेब सीरिज प्रत्येक माध्यमामध्ये तो अभिनयातून व्यक्त झाला आहे. मात्र नुकतीच जितेंद्रने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 30 एप्रिलला जितेंद्रच्या आजींचं निधन झालंय. रमाबाई शर्मा असं त्यांचं नाव होतं. करोनाची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने त्यांचं निधन झालं.

आजीच्या निधनानंतर जितेंद्र जोशीने त्यांचे काही फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहली आहे. सोबतच आजीच्या आठवणीत त्याने एक कविताही लिहिलीय. आजीच्या निधनाचं बद्दल सांगतानाच तो म्हणाला, “ती घरातील सर्वात हुशार महिला होती. ती एक उत्तम गायिका होती, अप्रतिम कूक होती आणि चार मुलांची एक खंबीर आई होती. तिने फक्त मुलांनाच नाही तर नातवंडांनाही मोठं केलं. तिने मला बर्‍याच गोष्टी शिकवल्या. जेव्हा मला करिअरी सुरुवात करायची होती. तेव्हा मला पाठिंबा देणारी ती एकमेव माझ्यासोबत होती. तिने आम्हाला कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवलं. ती माझ्यासोबत सदैव राहिल.” आजीच्या आठवणी सांगतानाच जितेंद्रेने आजींवर उपचार करणाऱ्या डाक्टरांचेदेखील आभार मानले.

यासोबतच जितेंद्रने आजीच्या आठवणीत एक कविता शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

मुझसे बेहतर
मुझीको जाननेवाली
मेरे बचपन को
आज भी पहचानानेवाली

मैं भी कच्चा हुँ ये जान लेता हूँ
बच्चा हूँ आज भी मान लेता हूँ
उसकी रूह में कहानियों का जिन है
उसके साथ मेरे बीते हुए दिन हैं

उसके निवालों ने मेरी
जबान को ज़ायक़ा सिखाया
बहुओं को ससुराल में बैठे
उनका मायका दिखाया

उसकी छुअन में मशवरा है
बातों में दिया सलाई है
आंखों में फ़कीर की पुकार
मन्नत में सबकी भलाई है

किसीकी प्यारी बिटिया थी
जो मुझे अपनी बिटिया दे गई
माँ ने माँ को पैदा किया और
हमें साया दे गई

उसकी रगों में जीने का
जुनून बेइन्तेहाशा है
न जाने कबसे कितनी ही
पुश्तों को इसने तराशा है

इसके होने से जैसे खुदा
मेरे कऱीब सा लगता है
दिन से पहले शुरू हो जाती है
उसके बाद सूरज जगता है

जिसके अंदर ढेर सारा प्यार
और जिंदगी भरी बेशुमार है
हर घर में किरदार तो होते हैं कई
लेकिन एक ही रॉकस्टार है

जिसके बिना मेरा बचपन
मेरी पूरी जिंदगी बेमानी है
बाप है पूरी दुनिया की लेकिन
मेरे लिए मेरी नानी है।
-जितेंद्र जोशी

आजीच्या निधनाच्या दु:खातही जितेंद्रने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. “कृपा करून घरात रहा, मास्कचा वापरा, तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या.” जितेंद्रच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्याचं सांत्वन केलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jitendra joshi lost his grand mother due to covid as he share emotional post and poem kpw

ताज्या बातम्या