Video : समाजातील प्रत्येक घटनेवर रोखठोक मत मांडणाऱ्या जितेंद्र जोशीची अनकट मुलाखत

पाहा, जितेंद्र जोशीची संपूर्ण मुलाखत

jitendra joshi
जितेंद्र जोशी

उत्तम अभिनयशैली आणि संवादकौशल्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता जितेंद्र जोशी याने अलिकडेच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर हजेरी लावली होती. यावेळी त्याने आयुष्यात आलेले चढ-उतार, करिअरची सुरुवात आणि कलाविश्वातील त्याच्या संपूर्ण प्रवासाविषय़ी अनेक गोष्टींचा उलगडा केला. तसंच समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवरही त्याने रोकठोकपणे मत व्यक्त केलं.

पाहा मुलाखत –

नाटक, सिनेमा, मालिका आणि त्यानंतर वेबसीरिज अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या जितेंद्रने ‘सेक्रेड गेम्स’मध्ये काटेकर ही भूमिका साकारत अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आज त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jitendra joshi special interview ssj

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या