मराठीमध्ये आता अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. विविध विषयांवर आधारित उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये ऐतिहासिकसह बायोपिक चित्रपटांचा देखील समावेश आहे. कंटेंट हाच मराठी चित्रपटांचा राजा असतो हे अगदी खरं आहे. उत्तम कथाच प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये घेऊन येते. आता मराठी चित्रपट सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अभिनेता जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये आता मराठी चित्रपटांनीही मानाचं स्थान मिळवलं आहे. जितेंद्र जोशीचा निर्माता म्हणून ‘गोदावरी’ हा पहिलाच चित्रपट. आपल्या पहिल्याच चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये स्थान मिळवल्याने त्याचा आनंद देखील गगनात मावेनासा झाला आहे. जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘गोदावरी’चं पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
usha mehta congress radio
ब्रिटिशांना आपल्या आवाजाने ‘सळो की पळो’ करून सोडणार्‍या उषा मेहतांची कहाणी

आणखी वाचा – ‘इंडियन पुलिस फोर्स’च्या चित्रीकरणादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राला दुखापत, व्हिडीओ आला समोर

“भारत सरकार तर्फे Cannes 2022 फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या स्क्रिनिंगसाठी पाठविण्यात येणाऱ्या सहा चित्रपटांच्या यादीत ‘गोदावरी’ला मानाचे स्थान!” असे जितेंद्रने पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे. गोदावरीकाठच्या शहरामध्ये राहणाऱ्या निशिकांत देशमुख आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आली आहे. जितेंद्र जोशीने यामध्ये मुख्य भूमिका देखील साकारली आहे. त्याचबरोबरीने नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले या कलाकारांच्या देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत.

आणखी वाचा – पूजा हेगडेने का घातलं सलमान खानचं ब्रेसलेट? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. तसेच प्राजक्ता देशमुख आणि निखिल महाजन यांनी या चित्रपटाची कथी लिहिली आहे, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा हा चित्रपट प्रदर्शित कधी होणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.