scorecardresearch

‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील ‘मल्हार’च्या हातावरील टॅटू ठरतोय चर्चेचा विषय, अर्थ आहे फारच खास

गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या हातावरील टॅटू हा चर्चेचा विषय ठरत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला.’ या मालिकेत सध्या नवनवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मल्हार आणि अंतराची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. नुकतंच या मालिकेतील मल्हारची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ चौगुले याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे त्याने त्याच्या हातावरील टॅटू मागचे कारण स्पष्ट केले आहे.

मल्हार फेम अभिनेता सौरभ चौगुले हा छोट्या पड्याद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. बऱ्याचदा सौरभ सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या हातावरील टॅटू हा चर्चेचा विषय ठरत आहे.

त्याचा या टॅटूमागचे कारण काय? त्याचा अर्थ काय? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेले आहेत. नुकतंच सौरभने एक इन्स्टाग्राम पोस्ट करत यामागचे कारण स्पष्ट केले आहे. सौरभने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याचा टॅटू आणि बाजूला एक वयस्कर व्यक्ती दिसत आहे. ही वयस्कर व्यक्ती त्याचे आजोबा असल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टला कॅप्शन देताना तो म्हणाला, “लोक नेहमी मला या टॅटूमागचे कारण विचारतात, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे! आजोबा ! माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक! तुम्ही आमच्या सोबत नसला तरी तुमच्या शिकवणीने मला नेहमीच आधार दिला आहे. मला तुमची खरोखर आठवण येत नाही कारण, तुम्ही मला वाटलेले जीवनाचे धडे कायम माझ्यासोबत आहेत.”

“जेव्हा जेव्हा माझ्याकडे कोणत्याही परिस्थितीची उत्तर नसतात तेव्हा मी माझ्या हातावरची तुमची स्वाक्षरी (टॅटू) पाहतो आणि मला जाणवते की तुम्ही माझा हात धरला आहे. त्याद्वारे मला मार्गदर्शन करत आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबा – तुमचा नातू,” अशी पोस्ट त्याने शेअर केली आहे.

सध्या त्याची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आहेत. आजोबांच्या वाढदिवसानिमित्त सौरभने शेअर केलेल्या पोस्ट ही प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jiv maza guntala malhar fame actor saorabh choughule share hand tattoo meaning with instagram post nrp

ताज्या बातम्या