बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. जॉनच्या शेवटच्या अनेक चित्रपटांनी विशेष काही केले नाही. यावेळी ओटीटीवर जॉन अब्राहमचे चित्रपट पाहता येत नाही आणि त्याविषयी बोलताना तो मोठ्या पडद्याचा अभिनेता आहे, असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : “अभद्र युत्या, पक्षनिष्ठा…”; महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

जॉनने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. ‘मला निर्माता म्हणून OTT आवडतो पण अभिनेता म्हणून नाही. मी या माध्यमासाठी आणि त्याच्या प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो पण एक अभिनेता म्हणून मला फक्त मोठ्या पडद्यावर यायचे आहे,” असे जॉन म्हणाला.

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

पुढे जॉन म्हणाला, महिन्याला २९९ किंवा ४९९ रुपये देऊन लोकांनी त्याला छोट्या पडद्यावर पाहावे असे त्याला वाटत नाही. त्याचा चित्रपट पाहताना घरात कोणीतरी मध्येच थांबेल ते त्याला खूप वाईट वाटेल, असेही जॉन म्हणाला.

आणखी वाचा : …म्हणून ‘धर्मवीर’ चित्रपटातील शेवटचा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

जॉनने पुढे सांगितले की तो ‘मोठ्या पडद्याचा नायक’ आहे आणि त्याला तसेच रहायचे आहे. तो म्हणाला, ‘मी आता फक्त तेच चित्रपट करणार आहे जे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होतील. माझे चित्रपट कोणीही त्यांच्या थांबवून वॉशरूमला जावे असे मला वाटत नाही. तसेच मी २९९ किंवा ४९९ रुपयांना महिना विकायला तयार नाही. मला फक्त OTT ची समस्या आहे.

आणखी वाचा : “काय मूर्खपणा चालला आहे! आपण…”, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

जॉन स्वत:ला मोठ्या पडद्याचा हिरो म्हणतं असला, तरी त्याचे शेवटचे ५ चित्रपट फ्लॉप झाले आहेत. जॉनचे ‘रोमियो अकबर वॉल्टर’, ‘बाटला हाऊस’, ‘पागलपंती’, ‘मुंबई सागा’, ‘सत्यमेव जयते 2’ आणि ‘अटॅक’ सातत्याने फ्लॉप ठरले आहेत आणि समीक्षकांकडून त्यांना संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

आणखी वाचा : अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? सुमीत राघवननं एकनाथ शिंदेंना केला प्रश्न

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॉनचा पुढचा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ २९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉनशिवाय तारा सुतारिया, दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर देखील दिसणार आहेत. याशिवाय जॉन शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातही दिसणार आहे.