Anant Ambani and Radhika Merchant Wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानी आज लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. या शाही आणि बहुचर्चित अशा लग्न सोहळ्याकडे देशासह जगभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे. या लग्नाला वेगवेगळ्या देशातील पंतप्रधान, हॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहिले आहे. प्रसिद्ध रेसलर जॉन सिनाने देखील अनंत-राधिकाच्या लग्नासाठी खास हजेरी लावली आहेत. भारतीय पोशाखात जॉन सिना पाहायला मिळाला असून त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नासाठी जॉन सीनाने खास भारतीय पोशाख परिधान केला आहे. आकाशी रंगाच्या जोधपुरीमध्ये जॉन सीना दिसत असून पापाराझीसमोर त्याचा हटके अंदाज पाहायला मिळाला. यावेळी त्याने सगळ्यांना नमस्कार केला आणि मग सिग्नेचर मूव केली. हेही वाचा - Video : अखेर तो क्षण आलाच! लग्नमंडपात अंबानी कुटुंबाची रॉयल एन्ट्री, मुलाच्या लग्नात वरमाई नीता अंबानींचा उत्साह जॉन सीनाला भारतीय पोशाखात पाहून अनेकांना सुखद धक्का बसला आहे. बऱ्याच जणांनी जॉन सीनाच्या या लूकचं कौतुक केलं आहे. "जॉन सीनाचा भारतीय लूक जबरदस्त", "जॉन सीनाने आज भारतीयांची मनं जिंकली", अशा अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रसिद्ध रेसलर जॉन सिनाची भारतीय पोशाखात अनंत-राधिकाच्या लग्नात हजेरी #Mumbai #AnantAmbani #AnantRadhikaWedding #JohnCena pic.twitter.com/j5KGM1Nq0G— LoksattaLive (@LoksattaLive) July 12, 2024 हेही वाचा - Isha Ambani Lehenga: शिव शक्ती पूजेला ईशा अंबानीने परिधान केलेला लेहेंगा तयार करायला लागले ४ हजार तास! जाणून घ्या खास वैशिष्ट्य… हेही वाचा - Video: चांदीचं नाणं अन्…; अनंत अंबानींच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळाली खास भेटवस्तू, पाहा व्हिडीओ दरम्यान, अनंत-राधिकाच्या लग्नाआधी दोन प्री-वेडिंग सोहळे पार पडले. गुजरात येथील जामनगरमध्ये दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा झाला. त्यानंतर दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली-फ्रान्स असा प्रवास करत क्रूझवर पार पडला होता. त्यानंतर जुलै महिना सुरू होताच बरेच कार्यक्रम आणि समारंभ पाहायला मिळाले. २ जुलैला सामूहिक विवाह सोहळ्यानंतर मामेरू समारंभ, गरबा नाईट, संगीत सोहळा, ग्रह शांती पूजा, शिव शक्ती पूजा आयोजित करण्यात आली होती. या सर्व समारंभ आणि पूजेनंतर आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत. अवघे काही तास दोघांच्या लग्नासाठी बाकी आहेत.