जॉन सीना देखील ‘बिग बॉस’चा फॅन; इन्स्टा पोस्टवरून चर्चांना उधाण

जॉन गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाला आहे.

WWE सुपरस्टार जॉन सीना जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पोर्ट्स सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखला जातो. आपल्या अनोख्या फाईटिंग स्किलसाठी प्रसिद्ध असणारा जॉन गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाला आहे.

आता यातील गंमतीशीर बाब म्हणजे जॉन आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अगदी काहीही पोस्ट करतो. कधी एक डॉलरची नोट, कधी एखादे माकड, तर कधी कुठल्याही क्षेत्रातील सेलिब्रिटींचे फोटो. या फोटोंवर कुठल्याही प्रकारचे कॅप्शन नसते. त्यामुळे तो फोटो त्याने का पोस्ट केला आहे, यामागचे कारण मात्र कोणालाच कळत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. यावेळी जॉनने इन्स्टाग्रामवर असिम रिआजचा फोटो पोस्ट केला आहे. असिम बिग बॉसच्या १३व्या पर्वातील एक स्पर्धक आहे. परंतु या फोटोवर देखील जॉनने नेहमीप्रमाणेच कुठल्याही प्रकारचे कॅप्शन लिहिलेले नाही. येत्या काही दिवसांत बिग बॉसच्या १३ व्या पर्वाचा शेवट होणार आहे. या रिअॅलिटी शोमध्ये असिम आघाडिच्या स्पर्धकांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर जॉन सिना असिमचा फोटो पोस्ट करुन त्याला सपोर्ट करत असल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही जॉनने ‘शिल्पा शेट्टी’, ‘रणवीर सिंग’, ‘सुशांत सिंग रजपूत’, ‘दलेर मेहंदी’ अशा अनेक भारतीय सेलिब्रिटींचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: John cena posts asim riazs photo fans cant believe he watches bigg boss 13 mppg

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या