मानहानीच्या खटल्यामुळे हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र आता हा खटला जिंकल्यानंतर जॉनी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. जॉनी आता पुन्हा त्याच्या अभिनयाकडे वळला आहे. डिस्नेने जॉनी डेपला माफीनामा पत्र पाठवले आहे, शिवाय त्याला ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ चित्रपटाच्या नवा भागासाठी २ हजार ५३५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

आणखी वाचा : घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थ जाधवने पत्नी तृप्तीसोबत शेअर केला फोटो

hardik pandya marathi news, krunal pandya marathi news
पंड्या बंधूंना बदनामीची धमकी
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Agra Woman Plans Husband Murder
पतीला ठार करण्यासाठी पत्नीने दिली ऑनलाईन ‘सुपारी’, What’s App वर ठेवलं ‘हे’ स्टेटस
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

या सुपरहिट फ्रँचायझीचे एकूण पाच भाग आले आहेत, ज्यामध्ये जॉनीने कॅप्टन जॅक स्पॅरोची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून जॉनीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. डिस्नेने आता या फ्रँचायझीच्या सहाव्या भागासाठी २ हजार ५३५ कोटी रुपये म्हणजेच ३०१ दशलक्ष डॉलर देणार असल्याचे म्हटले आहे. रिपोर्टनुसार चित्रपटाशी संबंधीत असलेल्या एका सुत्राने सांगितले की, कंपनी जॉनीला ३०१ दशलक्ष डॉलर देण्याची तयारी करत असून त्यासोबत एक माफीनामा देखील पाठवला आहे.

आणखी वाचा : Alia Bhatt Announce Pregnancy : आलिया भट्ट होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

पुढे सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘आशा आहे की जॉनी त्यांना माफ करेल आणि या भूमिकेसाठी परत येईल’. आत्तापर्यंत, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही, परंतु जॉनीचे चाहते त्याला पुन्हा एकदा कॅप्टन जॅक स्पॅरोच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘Love You’, अखेर सई ताम्हणकरने प्रेमाची दिली कबुली, दौलतरावांच्या ‘त्या’ पोस्टवर केली कमेंट

दरम्यान, याआधी अँबरचे प्रकरण पाहता जॉनी डेपकडून अनेक चित्रपट हिसकावण्यात आले होते. या चित्रपटांमध्ये ‘फँटास्टिक बीस्ट ३’ आणि ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ सारख्या चित्रपटांची नावे आहेत, ज्यांच्या निर्मात्यांनी जॉनीला चित्रपटासाठी साइन करण्यास नकार दिला होता.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

१ जून रोजी जॉनी डेपने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री अँबर हर्ड विरुद्ध मानहानीचा खटला जिंकला आहे. यासोबतच अँबर हर्डला जॉनीला ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार होते. पण जॉनीने हे पैसे घेण्यास नकार दिला होता.