scorecardresearch

जॉन्सन अँड जॉन्सनच्या #BeTheChangeForTB फेस असणार वाणी कपूर!

जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया तरुणांना ट्युबरक्युलॉसिसचा अंत करण्यासाठी सक्षम करणारा उपक्रम सुरु करत आहे.

johnson johnson, vaani kapoor, tb initiative,
जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया तरुणांना ट्युबरक्युलॉसिसचा अंत करण्यासाठी सक्षम करणारा उपक्रम सुरु करत आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया तरुणांना ट्युबरक्युलॉसिसचा अंत करण्यासाठी सक्षम करणारा उपक्रम- ‘बी द चेंज फॉर टीबी’ #BeTheChangeForTB कार्यक्रम सुरुकरणार आहे. कॉर्पोरेट टीबी प्लेज हा यूएसएआयडी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (एमओएचएफडब्ल्यू) केंद्रीय टीबी विभागाचा जॉइंट व्हेंचर आहे. बॉलिवूड अभिनेत्री वानी कपूरही या कार्यक्रमाचा फेस असणार आहे.

टीबीविरोधात चाललेल्या लढ्यातील एका असुरक्षित लोकसंख्यासमूहाचे प्रतिनिधित्व तरुणवर्ग करतो. टीबीचा धोका असूनही, तरुण टीबी केअरचा लाभ घेण्याची शक्यता कमी असते कारण, टीबीच्या लक्षणांबद्दल पुरेशी जागरूकता नसते, या आजाराशी कलंकाची भावना जोडलेली असते. आरोग्य प्रणाली उपलब्ध करून घेण्यात काही रचनेचे अडथळे जाणवतात तसेच कुटुंबाचा व समाजाचा आधार मिळत नाही. त्यामुळे लक्षावधी लोकांमध्ये टीबीचे निदानच होत नाही. भारतातील टीबीच्या एकूण रुग्णांमध्ये १८ ते ३० या वयोगटातील रुग्णांचे प्रमाण ३० टक्के असावे असा अंदाज आहे. म्हणूनच या उपक्रमाचे उद्दिष्ट बदल घडवून आणणाऱ्या तरुणांची एक श्रेणी तयार करणे हे आहे. हे तरुण बदलासाठी संप्रेरक म्हणून काम करून भारतातून टीबीचे निर्मूलन करण्यात मदत करू शकतात.

आणखी वाचा : “The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा”, म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

सोशल मीडिया, चॅटबॉट्स आणि अन्य माध्यमांतून तरुण ‘चेंजमेकर्स’ तयार करणे हे #BeTheChangeForTB या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. हे तरुण आजाराबद्दलची जागरूकता वाढवू शकतील. तरुणांचा संवाद व सहभाग निर्माण करू शकतील आणि सरकारच्या टीबी-मुक्त भारताच्या उद्दिष्टाला सहाय्य होईल अशा पद्धतीने आरोग्यासाठी मदत घेण्याचे वर्तन सुधारू शकतील. हा कार्यक्रम भारतातील लोकप्रिय युथ आयकॉन्ससह सुरू केला जात आहे. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री वानी कपूर ‘बी द चेंज फॉर टीबी’ अभियानाचा चेहरा असणार आहे. तसेच काम भारी या नावाने ओळखला जाणारा भारतातील तरुण हिप-हॉप रॅपर व गीतकार कुणाल पंडागळे ही भारतीय तरुणांना प्रेरणा देणाऱ्या या चळवळीत सहभागी होणार आहे.

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

निदान न झालेल्या टीबीसह आयुष्य कंठणाऱ्या लक्षावधींना शोधून काढण्यासाठी जागतिक पातळीवर चाललेल्या प्रयत्नांमध्ये हा उपक्रम मदत करत आहे. टीबीसारख्या प्राणघातक तरीही टाळता येण्याजोग्या विकाराचे २०३० पर्यंत निर्मूलन करण्याच्या, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करण्यात, मदत पुरवण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनने आखलेल्या १० वर्षांच्या उपक्रमांचा हा भाग आहे.

आणखी वाचा : Braची जाहिरात केली म्हणून अभिनेत्रीला पाकिस्तानी चाहत्यांनी केले ट्रोल, म्हणाले “तुला लाज वाटली पाहिजे”

वानी कपूर या उपक्रमाच्या वेळी म्हणाली, “टीबीचा सामना करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर चाललेल्या प्रगतीला कोविड साथीमुळे खिळ बसली तर, गेल्या दहा वर्षांत प्रथमच टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. केवळ भारतात, टीबीवर मोफत उपचार केले जात असूनही, टीबीमुळे दररोज १३००हून अधिक जणांचा मृत्यू होतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही परिस्थिती बदलणे अत्यावश्यक आहे. ‘बी द चेंज फॉर टीबी’ या उपक्रमाचा भाग होण्याची संधी मिळणे. माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे आणि मी देशातील व जगभरातील लोकांना, या चळवळीत सहभागी होण्याचे आणि उपचारांबाबत पडताळणी केलेल्या माहितीचा प्रसार करून व लोकांना लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी प्रोत्सादन देऊन बदल घडवून आणण्यात योगदान देण्याचे, आवाहन करते. आपण सगळे एकत्र आलो तर भारतातील टीबीचे प्रमाण कमी करू शकू, असा आत्मविश्वास मला वाटतो.”

आणखी वाचा : शूटिंगदरम्यान सीन कट झाला तरी इम्रान हाश्मीला KISS करत राहिली ‘ही’ अभिनेत्री, Video Viral

या कार्यक्रमांचा प्रभाव कमाल स्तरावर नेण्यासाठी तसेच यातून नवीन धडे मिळवण्यासाठी सहयोग अत्यावश्यक असतो. त्यासाठीच जॉन्सन अँड जॉन्सन, टीबी, तरुणांद्वारे मिळणारी सेवा आणि जागतिक आरोग्य व्यवस्था या क्षेत्रांतील काही महत्त्वाच्या घटकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून टीबीविरोधातील लढ्यात तरुणांना सहभागी व सक्रिय करणे व सर्वोत्तम पद्धती सर्वांपर्यंत पोहोचवणे हे अधिक कार्यक्षमतेने केले जाऊ शकेल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Johnson johnson india launches change tb initiative vaani kapoor face campaign dcp

ताज्या बातम्या