हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि एंबर हर्ड त्यांच्या मानहानीच्या केसमुळे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत. या केसमध्ये दोघांनीही एकमेकांबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. जॉनी डेपनंतर एंबर हर्डनं आपल्या स्टेटमेंटमध्ये जॉनीवर धक्कादाय आरोप केले होते. एंबरनं तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि तिला मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र आता यावर जॉनीच्या चाहत्यानं केलेलं ट्वीट चर्चेत आहे. जॉनीच्या चाहत्यांनी एंबर हर्ड न्यायालयात केवळ नाटक करत असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही तर तिने दिलेलं स्टेटमेंट चित्रपटाच्या डायलॉगशी मिळतं जुळतं असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाली एंबर हर्ड?
मिळालेल्या माहितीनुसार एंबर हर्डनं सांगितलं की, तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेपनं तिचा लैंगिक छळ करण्यासोबतच फुटलेल्या काचेच्या बॉटलच्या सहाय्याने चेहरा बिघडवून टाकण्याची धमकी दिली होती. एंबरच्या म्हणण्यानुसार ही घटना त्यांच्या लग्नाच्या केवळ एक महिन्यानंतर घडली होती. आपलं स्टेटमेंट देताना एंबरनं तिचा अनेकदा लैंगिक आणि शारीरिक छळ झाल्याचं स्पष्ट केलं. या घटना २०१५ साली ऑस्ट्रेलियामध्ये घडल्या होत्या. त्यावेळी जॉनी डेप त्याची लोकप्रिय वेबसीरिज ‘पाइरेट्स ऑफ द कॅरेबियन’च्या पाचव्या सीझनचं शूटिंग करत होता.

आणखी वाचा- “त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये…” लैंगिक अत्याचारांबद्दल सांगताना ढसाढसा रडली जॉनी डेपची पत्नी

एंबर म्हणाली, “त्याने माझ्यावर दारूची बॉटल फेकून मारली होती. पण देवाच्या कृपेनं मी या हल्ल्यातून वाचले. जॉनी माझ्यावर सातत्यानं सोडा आणि बियरच्या बॉटल फेकून मारत होता. माझ्यावर जोरजोरात ओरडत होता की मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्यामुळे आता तो फुटलेल्या काचेच्या बॉटलने माझा चेहरा बिघडवून टाकणार आहे. त्यानंतर त्यानं माझा नाईट गाऊन फाडून टाकला आणि त्याच बॉटलने माझ्यावर लैंगिक अत्याचार केले.” हे सर्व सांगत असताना एंबरला अश्रू अनावर झाले आणि ती ढसाढसा रडू लागली. दरम्यान एंबरनं केलेले सर्व आरोप जॉनीनं फेटाळून लावले आहेत. एवढंच नाही तर बरेचदा एंबर त्याच्यासोबत हिंसक झाल्याचं त्यानं म्हटलं होतं.

त्यानंतर आता सोशल मीडियावर दोघांचे चाहते एकमेकांशी भिडलेले पाहायला मिळत आहेत. जॉनी डेपच्या चाहत्यांनी दावा केला आहे की, एंबर हर्डनं न्यायालयात दिलेल्या स्टेटमेंटमध्ये चित्रपट ‘द टॅलेंटेड मिस्टर रिपली’मधील डायलॉगचा समावेश आहे. जॉनीच्या चाहत्यांनी, एंबर स्टेटमेंट देताना रडण्याचा अभिनय करत होती. तिने त्यासाठी चित्रपटातील डायलॉगची मदत घेतली होती. एंबरनं १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील संवाद जसेच्या तसे वापरले होते. याचा स्क्रिनशॉट देखील त्याचं ट्विटरवर शेअर केला आहे.

आणखी वाचा- लिएंडर पेस- किम शर्मा लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? चर्चांना उधाण

दरम्यान एक फॅक्ट चेक वेबसाइटनं हा दावा खोटं असल्याचं म्हटलं होतं मात्र त्यावरही आणखी एका चाहत्यानं एंबर न्यायालयात स्टेटमेंट देत असतानाचा व्हिडीओ आणि चित्रपटाची क्लिप शेअर केली आहे. ज्यात एंबरचं स्टेटमेंट आणि चित्रपटातील डायलॉगमध्ये बरीच समानता असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र यावर जॉनी किंवा एंबरनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.