Joseph Vijay fitness secret: तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय ५२ व्या वर्षीही त्यांच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे फिटनेस ट्रेनर नरेश कुमार यांनी एका मुलाखतीत विजय यांची दिनचर्या, जीवनशैली, त्यांच्या आहारात कोणते पदार्थ असतात, ते कोणत्या प्रकारचे व्यायाम करतात याबद्दल सांगितले.
मे २०२६ मध्ये Times Nowला दिलेल्या मुलाखतीत नरेश म्हणालेले की, विजय यांचे वेळापत्रक व्यग्र असते. पण, तरीही ते घरून जेवण घेऊन जातात. राजकीय दौरे आणि रॅलींमध्येही ते घरचेच जेवण खातात, ते जंक फूड खाणे टाळतात.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या फिटनेसचे ‘हे’ आहे सिक्रेट
एप्रिल २०२२ मध्ये IBC Mangaiशी बोलताना नरेश यांनी सांगितले होते की, विजय कोणताही पदार्थ पूर्णपणे बंद करत नाहीत. ते सगळं खातात पण प्रमाणात खातात. त्यांच्या म्हणण्यानुसार, विजय साधारणपणे सकाळी लवकर, म्हणजेच ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान उठतात. कामाचे वेळापत्रक कितीही व्यग्र असले तरी त्यांच्या दिनचर्येत फारसा बदल होत नाही.

नरेश यांनी सांगितल्याप्रमाणे, विजय ९ वाजता नाश्ता करतात. त्यांच्या नाश्त्यामध्ये दोन इडल्या आणि अंडी असतात. दुपारी साधारण १ वाजता ते जेवण करतात. त्यांच्या जेवणात घरगुती पदार्थ, भाज्या आणि फळांचा समावेश असतो. भाताबरोबर प्रथिनयुक्त पदार्थही असतात, मात्र त्याचे प्रमाण नियंत्रित असते. दुपारी जेवल्यानंतर आणि संध्याकाळी जेवण्याआधी भूक लागल्यास विजय सलाद खातात. कधीकधी जे ज्यूस पितात. विजय रात्रीचे जेवण कमी करतात. सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान ते जेवतात. त्यांच्या रात्रीच्या जेवणात सूप किंवा सलादसारखे पदार्थ असतात.

नरेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, विजय यांच्या आहारात चिकन आणि मासे यांचाही समावेश असतो. मात्र, त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. म्हणजेच मांसाहारी पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी मर्यादित प्रमाणात खाण्यावर त्यांचा भर असतो. चालणे, धावणे, वेट ट्रेनिंग, सायकलिंग असे व्यायाम ते करतात.

विजय शिस्तबद्ध आहार घेतात, पण त्यांना मटण बिर्याणी खाणे प्रचंड आवडते. तसेच, त्यांना सक्कराई पोंगल (sakkarai pongal) हा गोड पदार्थही आवडतो.
