'त्या' व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले? घ्या जाणून | Journey of ram gopal varma from engineer to director | Loksatta

‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले? घ्या जाणून

त्यांनी अभिनेत्रीच्या पायाला किस करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता.

‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले? घ्या जाणून
(File Photo)

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांनी अभिनेत्रीच्या पायाला किस करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. तेलुगू चित्रपटात काम करणाऱ्या आशू रेड्डीबरोबर त्यांनी हे कृत्य केलं. त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी हे कृत्य केलं. गेली अनेक वर्ष ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. पण मुळात त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. इंजिनियर ते दिग्दर्शक हा त्यांचा प्रवास फार रंजक आहे.

राम गोपाल वर्मा सिव्हिल इंजिनीअर आहेत. ‘मिड डे’च्या वृत्तानुसार, त्यांना लाहानपणीपासून चित्रपट पाहण्याची आवड होती. विजयवाडा येथील सिद्धार्थ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना ते वर्ग बंक करून चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात असत. ते आठवड्यातून किमान आठ ते दहा चित्रपट पाहायचे. अशाप्रकारे विविध चित्रपट पाहूनच ते दिग्दर्शन करण्याचं तंत्र शिकले.

आणखी वाचा : …म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर त्यांनी चित्रपट सृष्टीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु थोड्याच दिवसात त्यांनी त्यांचे प्रयत्न थांबवले आणि पैसे मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. एक दिवस त्यांचा एक मित्र त्यांना हैदराबाद येथील एका व्हिडीओ लायब्ररीत घेऊन गेला. तिथे गेल्यावर आपणही हा व्यवसाय करावा असं त्यांच्या मनात आलं. थोड्याच दिवसात पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनीही त्यांची स्वतःची व्हिडीओ लायब्ररी सुरू केली. याच व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची एका दिग्दर्शकाची भेट झाली आणि त्यांचा मनोरंजन सृष्टीतील प्रवास केला.

हेही वाचा : Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

राम गोपाल वर्मा यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिवा’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आता त्यांचा ‘डेंजरस’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी केलेल्या कृतीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 17:30 IST
Next Story
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ फेम पाकिस्तानी तरुणीला विकायचाय तिचा हिरवा ड्रेस; किंमत आहे तब्बल….