गेल्या काही वर्षांपासून रिमिक्स गाण्यांचे वारे वाहू लागले आहेत. ८०-९०च्या दशकात सुपरहिट झालेली गाणी पुन्हा एकदा नव्या अंदाजात रसिकांसमोर सादर केली जातात त्याला आपण रिमिक्स म्हणतो. मात्र या प्रकारामुळे रिमिक्स वर्सेस ओरिज्नल असा एक नवा वाद जन्माला आला आहे. खुद्द ए. आर. रेहमान यांनी देखील रिमिक्स गाण्यांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता गायक जुबिन नौटियाल याने रिमिक्स वर्सेस ओरिज्नल वादावर प्रतिक्रिया दिली आहे. “रिमिक्स गाणी तयार करण्यात काहीही गैर नाही त्यामुळे जुनी गाणी आणखी लोकप्रिय होतात”, असं मत त्याने नोंदवलं आहे.

अवश्य पाहा – “करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडलाईफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत जुबिनने रिमिक्स गाण्यांच्या निर्मितीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “रिमिक्स गाणी तयार करण्यात काहीही गैर नाही. ही गाणी रसिकांना देखील आवडतात. जुन्या गाण्याला पुन्हा गाऊन आपण त्याला सेलिब्रेट करु शकतो. त्या गाण्याचं मॅजिक आपण नव्या अंदाजात अनुभवू शकतो. फक्त ही गाणी योग्य प्रकारे तयार करायला हवी.”

अवश्य पाहा – “तुझं ऐकून आम्ही पानमसाला खातोय”; Immunity Booster च्या जाहिरातीवरुन अजय देवगण ट्रोल

जुबिन नौटियाल बॉलिवूडमधील नामांकित गायकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर ‘मेरी आशिकी’, ‘तूम मेरे हो’, ‘बिमार दिल’, ‘इक मुलाकात हो’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत. तसेच ‘गजब का है दिन’, ‘सो गया ये जहा’, ‘फिर मुलाकात’, ‘जिंदगी कुछ तो बता’ यांसारखी अनेक रिमिक्स गाणी देखील गायली आहेत.