‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? नव्या अंदाजात दिसले वरुण-कियारा

वरुण धवन आणि कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Jug Jugg Jeeyo, Jug Jugg Jeeyo Trailer
वरुण धवन आणि कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला 'जुग जुग जियो' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ‘जुग जुग जियो’ चित्रपटाची चर्चा रंगत आहे. हा चित्रपट नेमका काय आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अखेरीस चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही तासांमध्येच या ट्रेलरला प्रेक्षकांना भरभरून पसंती दिली आहे. तसेच वरुण धवन आणि कियारा अडवाणीचा एक नवा अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

‘जुग जुग जियो’ चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर यांची देखील मुख्य भूमिका आहे. कियारा आणि वरुण पती-पत्नीची भूमिका साकारताना या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. पती-पत्नी असले तरी दोघ एकमेकांबरोबर खूश नसल्याचंही यामध्ये दिसून येतं. आपला घटस्फोट व्हावा अशी इच्छा या जोडप्याची असते आणि त्यातूनच घडणाऱ्या गंमती-जमती या चित्रपटामध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा – Photos : तेजस्विनी पंडित-प्राजक्ता माळीलाही ‘रानाबाजार’मधील ‘ती’ अभिनेत्री देते टक्कर, पहिल्यांदाच केलं वेबसीरिजमध्ये काम

अनिल कपूर आणि नीतू कपूर या चित्रपटामध्ये कियारा-कार्तिकच्या आई-वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. तसेच मनोरंजनाचा डबल डोस या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कियारा-वरुणची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – ‘धाकड’च्या अपयशानंतर कंगना रणौतने शेअर केली पोस्ट, ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाबाबत म्हणाली…

राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच अभिनेता मनिष पॉल देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मनिषची झलकही पाहायला मिळत आहे. २४ जूनला हा बहुप्रतिक्षित चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jug jugg jeeyo trailer varun dhawan kiara advani neetu kapoor and anil kapoor film trailer released watch here kmd

Next Story
Video : …अन् अचानक कियाराला उचलून घेऊन धावू लागला वरुण धवन, पाहा नेमकं काय घडलं
फोटो गॅलरी