जुही चावला झाली अलिबागकर…विकत घेतलेल्या जागेची किंमत ऐकलीत का?

जुहीचा आज ५४ वा वाढदिवस आहे.

juhi chawla, juhi chawla alibaug property,
जुहीचा आज ५४ वा वाढदिवस आहे. (Photo Credit: Juhi Chawla Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाचा आज वाढदिवस आहे. जुहीचा आज ५४ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि जुही हे बेस्ट फ्रेंड्स आहेत. जुहीने शाहरुखचा मुलगा आर्यन खानसाठी सत्र न्यायालयात १ लाख रुपयांच्या बेल बाँडवर स्वाक्षरी केल्यामुळे ती चर्चेत होती. दरम्यान, जुहीने अलिबागमध्ये एक नवा प्लॉट विकत घेतल्याची बातमी समोर येत आहे.

जुहीने अलिबागमध्ये प्लॉट विकत घेतल्याची माहिती ‘झॅपकी डॉट कॉम’च्या हवाल्याने ‘मनी कंट्रोल’ने हे वृत्त दिलं आहे. जुहीने .३०६० हेक्टर्सची जमीन अलिबागमधील मापगावला घेतली आहे. ही जमीन जुहीने १.८९ कोटी रुपयांमध्ये विकत घेतली आहे. या जमीनीच्या व्यवहारासाठी जुहीने ११.३४ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली.

आणखी वाचा : “तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले?”; अभिनेत्रीने संतापून पत्रकारालाचा विचारला हा विचित्र प्रश्न

२२ ऑक्टोबरला या व्यवहाराच्या कागदपत्रांची नोंदणी झाल्याचे म्हटले जाते. जुहीने या व्यवहाराविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. तर, सप्टेंबर महिन्यात बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंहने अलिबागमध्ये २२ कोटी रुपये देत एक बंगला विकत घेतला आहे. द एव्हरस्टोन ग्रुपचे राजेश जग्गी यांच्या मालकीचा हा बंगला होता.

आणखी वाचा : “२०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती…”, म्हणतं अभिनेत्याने उडवली खिल्ली

दरम्यान, काल आर्यनच्या वाढदिवसानिमित्ताने जुहीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत तिने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच काय तर जुहीने त्याच्या वाढदिवसानिमित्ताने एक संकल्प देखील केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Juhi chawla buys property in alibaug for rs 1 89 crore dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या