बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला आणि किंग खान म्हणजेच शाहरुख खान यांची ऑनस्क्रिन जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी आहे. त्या दोघांनी सहकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली आणि आज हे दोघे चांगले मित्र-मैत्रिण आहेत. त्यामुळे फक्त ऑनस्क्रिन जोडीच नाही तर त्यांच्यात असलेल्या मैत्रिचे नेहमीच अनेक उदाहरणे दिली जातात. दरम्यान, शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त जूहीने एक मोठी घोषणा केली आहे.

जूही आणि शाहरुखच्या मैत्री विषयी सगळ्यांना ठावूक होते. मात्र, त्यांच्या मैत्रीची चर्चा ही पुन्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर सुरु झाली. आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर त्याच्या जामीनदार म्हणून जूही पुढे आली होती. २ नोव्हेंबर रोजी शाहरुखने त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. त्याच निमित्ताने ५०० झाडं लावण्याची घोषणा केली आहे.

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

आणखी वाचा : “पहिल्याच डेटवर बॉयफ्रेंडने केली शरीरसुखाची मागणी…”, ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा

जूहीने शाहरुखच्या वाढदिवसानिमित्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये जूहीने त्या दोघांच्या अनेक फोटोंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच काय तर त्याला कॅप्शन देत जूहीने ५०० झाडे लावणार असल्याची घोषणा केली आहे.