Video : दोन महिन्यानंतर जुही घरी परतल्यानंतर मुलीने दिली अशी प्रतिक्रिया

गेल्या दोन महिन्यांपासून जुही ‘हमारी वाली गुड न्युज’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर होती.

juhi parmar return home after 2 months to daughter
(Photo Credit : Juhi Parmar Instagram)

अभिनेत्री जुही परमार छोट्या पडद्यावरील ‘कुम कुम एक प्यारासा बंधन’ या मालिकेतून प्रकाश झोतात आली. दरम्यान, करोना काळात महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणाला मनाई होती. आता अवघ्या दोन महिन्यांनंतर जुही मुंबईत तिच्या घरी परत आली आहे. दोन महिन्यांनंतर जुही घरी परतल्यानंतर तिच्या लेकीने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ जुहीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : ‘अमृताला कानशिलात लगावली मला त्याच वाईट वाटतं नाही’, इशा देओलने केला खुलासा

जुहीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जुहीने लाल रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर, जुही तिच्या मुलीच्या रूमचा दरवाजा उघडते आणि जुहीला पाहुन तिच्या मुलीचा आनंद हा शिगेल पोहोचल्याचे दिसते. हा व्हिडीओ शेअर करत “दोन महिने बाहेर चित्रीकरण केल्यानंतर मी आज घरी परत येणार याची तिला कल्पना नव्हती, म्हणून हा आश्चर्यचकित आणि आनंदी चेहरा पाहायला मिळतं आहे. तुझ्यापासून दोन महिने दूर राहणे माझ्यासाठी किती अवघड होते हे फक्त मला माहित आहे,” असे जुही म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Juhi Parmar (@juhiparmar)

पुढे जुही म्हणाली, “ही पहिलीच वेळ होती जेव्हा मी तुझ्यापासून इतके दिवस लांब होती आणि मी तुला प्रत्यक्षात पाहिलं नाही हे दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. ज्या प्रकारे तू मला मिठी मारलीस, ज्या प्रकारे तू मला धरले, तो क्षण तिथेच थांबवण्याची माझी इच्छा होती. या जगात मुलांवर आई एवढं प्रेम कोणी करत असेल मला वाटत नाही. त्यांच नातं हे वेगळं आहे.”

आणखी वाचा : सलमानने नकारलेल्या ‘या’ चित्रपटांमुळे शाहरुख झाला रातोरात स्टार, जाणून घ्या चित्रपटांविषयी

जुहीची मुलगी समायराने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आई सोबत फोटो शेअर केले आहेत. “मी दररोज दिवस मोजतं होते, रोज झोपायला जाताना मला तुझी आठवण येत होती. तू परत आल्याने मला आनंद झाला आहे”, अशा आशयाचे कॅप्शन समायराने फोटो शेअर करत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samairra Tales (@samairratales)

दरम्यान, जुही सध्या ‘हमारी वाली गुड न्युज’ या मालिकेत सध्या मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ती मुंबईच्या बाहेर गेल्या दोन महिन्यापासून होती. जुहीचे लाखो चाहते आहेत. जुही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Juhi parmar returns home to her daughter after 2 month s the little one s response dcp