गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज सांगता झाली. वेगवेगळ्या चित्रपटांचं या महोत्सवात स्क्रीनिंग झालं. मातब्बर कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. तसेच इतरही देशातील प्रतिष्ठित कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. वेगवेगळ्या कलाकारांनी या मंचावर त्यांचं मनोगत आणि चित्रपटसृष्टीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

या महोत्सवातील ज्युरी हेड आणि इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनीही महोत्सवात मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’वर निशाणा साधला. अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाने तब्बल ३०० कोटीहून अधिक कमाई केली. यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला हिंदी चित्रपट होता. या चित्रपटामुळे बरेच वादही निर्माण झाले.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”

या चित्रपटाला अशा महोत्सवात स्थान मिळणं याविषयी नादव लॅपिड यांनी खंत व्यक्त केली आहे. या सोहळ्यात बोलताना लॅपिड म्हणाले, “या महोत्सवतील १५ वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूपच अस्वस्थ झालो. आमच्यामते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा (प्रोपगंडा) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे.”

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना टॅग करून यावर व्यक्त होण्याची विनंती केली आहे. ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला भारतात प्रदर्शित करण्याआधी इतर देशांमध्ये दाखवण्यात आलं होतं. शिवाय या चित्रपटाला भारतात अभूतपूर्व असं यश मिळालं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर विवेक अग्निहोत्री कोविड काळातील लसीकरण या विषयावर चित्रपट आपल्यासाठी घेऊन येत आहेत.