Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा काल, ५ जुलैला मोठा थाटामाटात संगीत सोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यासाठी खास मुकेश अंबानींनी जगप्रसिद्ध पॉपस्टर जस्टिन बीबर बोलावलं होतं. माहितीनुसार, संगीत सोहळ्यातील काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबानींनी जस्टिनला ८३ कोटी रुपये इतकं मानधन दिलं होतं. अशा या कोट्यवधी रुपयांचं मानधन घेणाऱ्या जस्टिन बीबरचे संगीत सोहळ्यातील परफॉर्मन्सचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये जस्टिनच्या गाण्यावर अंबानींचे पाहुणे जबरदस्त थिरकताना दिसत आहेत. याआधी मुकेश अंबानींनी आपल्या लाडक्या लेकाच्या प्री-वेडिंगमध्येही जगप्रसिद्ध पॉपस्टार्सच्या परफॉर्मन्सचं आयोजन केलं होतं. गुजरातमधील जामनगर येथे पार पडलेल्या अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगमध्ये प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने परफॉर्मन्स केला होता. यासाठी अंबानींनी तब्बल ५२ कोटी रुपये मोजले होते. त्यानंतर फ्रान्समध्ये झालेल्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी कॅटी पेरीला अंबानींनी ४० ते ४५ कोटी रुपये मानधन दिलं होतं. त्यानंतर आता ८३ कोटी रुपये खर्च करून अंबानींनी लेकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी जस्टिन बीबरला बोलावलं होतं. संगीत सोहळ्याच्या दिवशी पहाटे जस्टिन मुंबईत दाखल झाला होता. हेही वाचा - Video: अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात सलमान खानच्या गाण्यावर रणवीर सिंहचा एनर्जेटिक डान्स, तर कपूर भावंडं थिरकली ‘या’ गाण्यावर अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन स्वतःची लोकप्रिय गाणी ‘बेबी’, ‘नेवर लेट यू गो’, ‘लव्ह युवरसेल्फ’, ‘बॉयफ्रेंड’, ‘सॉरी’ आणि ‘व्हेअर आर यू नाउ’ यावर परफॉर्म करताना दिसला. त्याच्या या लोकप्रिय गाण्यांवर अंबानींचे पाहुणे जबरदस्त थिरकले. तसंच बॉलीवूड सेलिब्रिटी देखील डान्स करताना पाहायला मिळाले. बॉलीवूडच्या बऱ्याच कलाकारांनी जस्टिन बीबरच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे. हेही वाचा - Video: संगीत सोहळ्यात अनंत अंबानीचा सलमान खानबरोबर सोनू निगमच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ दरम्यान, जस्टिन काल रात्री झालेल्या परफॉर्मन्सनंतर लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे आज सकाळी अमेरिकेला रवाना झाला. यावेळी मुंबई विमानतळावर त्याच्याबरोबर त्याची टीम पाहायला मिळाली. हेही वाचा - Video: संगीत सोहळ्यातील अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांची जिंकली मनं, पापाराझींना म्हणाले… अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर, १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी दोघं लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.