Kaanta Laga directors paid tribute to Shefali Jariwala : शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले आणि तिच्या निधनाने केवळ तिच्या चाहत्यांना आणि कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला. शेफालीचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

अभिनेत्रीच्या निधनानंतर, राधिका राव आणि ‘कांटा लगा’ या गाण्याच्या व्हिडीओचे दिग्दर्शन करणारे विनय सप्रू यांनी सोशल मीडियावर शेफाली जरीवालाला श्रद्धांजली वाहिली आणि ‘कांटा लगा’ या गाण्याचा सिक्वेल किंवा रिमेक कधीही येणार नाही याची पुष्टी केली.

‘कांटा लगा’चा सिक्वेल का येणार नाही?

गुरुवारी (३ जुलै) इन्स्टाग्रामवर एका भावनिक पोस्टमध्ये राधिका आणि विनय यांनी लिहिले की, “काल प्रार्थना सभा होती. शेवटचा निरोप… आमचा पहिला फोटो सेशन एकत्र… ‘कांटा लगा’ – सीडी इनले कार्ड.” त्यांनी पुढे लिहिले की, आता दुसरी कोणी कांटा लगा नसेल आणि शेफाली नेहमीच ‘एकमेव कांटा लगा गर्ल’ राहील. त्यांच्या भावनिक नोटमध्ये त्यांनी लिहिले की, “तू नेहमीच म्हणायचीस की तुला एकमेव ‘कांटा लगा’ गर्ल व्हायचे आहे, म्हणून आम्ही कधीही सिक्वेल बनवला नाही आणि आताही बनवणार नाही. आम्ही ‘कांटा लगा’ कायमचा रिटायर करत आहोत. ते नेहमीच तुझे होते, ते नेहमीच तुझे असेल… शेफाली… RIP.”

शेफालीने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘कांटा लगा’ या गाण्याच्या रीमिक्सने प्रसिद्धी मिळवली, जी देशभरात एका रात्रीत प्रसिद्ध झाली आणि पॉप संस्कृतीच्या इतिहासात तिचे नाव कोरले. काही वर्षांनंतर, २०२० मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत शेफालीने खुलासा केला होता की, या गाण्याने तिचे आयुष्य पूर्णपणे कसे बदलले. ती म्हणाली होती, ‘कांटा लगा’ला १७ वर्षे झाली आहेत आणि मला विश्वास बसत नाहीये. जणू काही कालच घडले आहे असे वाटते. कांटा लगा माझ्याबरोबर योगायोगाने घडला. मी माझ्या कॉलेजबाहेर आराम करत होते आणि व्हिडीओचे दिग्दर्शक, राधिका राव आणि विनय सप्रू यांनी मला तिथे पाहिले. त्यांनी मला हे गाणे ऑफर केले. मी फक्त मजा करण्यासाठी आणि थोडेसे पैसे कमविण्यासाठी हो म्हटले. त्यामुळे माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्या गॉडमदर्ससारख्या होत्या, याने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले.”

शेफाली जरीवालाची दोन लग्न झाली होती. तिचे पहिले लग्न २००४ मध्ये हरमित सिंग याच्याशी झाले होते, परंतु २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.