scorecardresearch

‘कांतारा’ अभिनेत्याचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड; पोस्ट शेअर करत सांगितले कारण

किशोर सोशल मीडियावर सक्रीय असतो विविध मुद्द्यांवर तो भाष्य करत असतो

‘कांतारा’ अभिनेत्याचे ट्वीटर अकाउंट सस्पेंड; पोस्ट शेअर करत सांगितले कारण
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

कांतारा चित्रपटातीने जशी रिषभ शेट्टीला नवी ओळख मिळाली तशीच त्यातील वन अधिकाऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता किशोर सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झाले आहे मात्र ट्वीटरने त्याचे अकाउंट ब्लॉक केले होते. यावरून त्याने काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून ट्वीटरने कारवाई केली अशी चर्चा असताना आता अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

कोणत्या ट्वीटमुळे हे घडले असा प्रश्न चाहत्यांना पडला असतानाच त्याने यावर भाष्य केलं आहे त्याने पोस्टमध्ये लिहलं आहे, “कोणते ही गैरसमज होण्याआधी मी सांगू इच्छितो माझ्या कोणत्याही पोस्टमुळे माझे ट्वीटर खाते निलंबित करण्यात आले नाही. २० डिसेंबर २०२२ रोजी हॅकिंगमुळे हे घडल्याचे मला कळले आहे. ट्वीटरने आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे. सगळ्यांचे आभार मानतो.” असे त्याने लिहले आहे.

किशोर उत्तम अभिनेता आहेच तो सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. चित्रपटाच्याबरोबरीने तो राजकारण सामाजिक विषयांवर भाष्य करत असतो. कन्नड चित्रपट ‘अट्टाहासा’ मधील वीरप्पनची भूमिका त्याची विशेष गाजली. केवळ कन्नडच नव्हे तर तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये तो काम करतो.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 20:54 IST

संबंधित बातम्या