Birthday Special: सायकल चालवताना काजोल तोंडावर पडली आणि पुढे असं काही घडलं की सगळेच घाबरले

‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील ‘ये लडका है दिवाना’ या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेचा हा किस्सा आहे.

kajol-shaharukh-khan (1)
(File Photo)

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सुपरहिट सिनेमांमधून काजोलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. खास करून शाहरुख खानसोबतचे काजोलचे अनेक सिनेमे चांगलेच गाजले आहेत. यातील ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाने तर लोकांना वेड लावलं होतं. मात्र तुम्हाला माहित आहे का या सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगवेळी काजोल सायकल वरून पडली होती आणि काही तासांसाठी तिची तात्पुरती स्मृती गेली होती.

जागतिक सायकल दिनाच्या दिवशी काजोलने या सिनेमाच्या शूटिंगवेळीचा एक व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील ‘ये लडका है दिवाना’ या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत शाहरुख खान आणि काजोल सायकल चालवताना दिसत आहेत. यात सायकल चालवणाऱ्या शाहरुखच्या वाटेला जाणं काजोलच्या महागात पडल्याचं दिसतंय. काजोल सायकल चालवत असतानाच शाहरुखला कट मारण्याता प्रयत्न करते आणि थेट तोंडावर पडताना दिसतेय. करण जोहर आणि मनिष मल्होत्राने देखील या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केल्या होत्या.

फोटो पहा: Birthday Special: “तो अजिबात रोमॅण्टिक नाही पण…”; काजोल अजय देवगणची लव्ह स्टोरी

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

करण जोहरची मजेशीर कमेंट

यात ‘कुछ कुछ होता है’ सिनेमाचं दिग्दर्शन करणारा आणि काजोलचा जवळचा मित्र करण जोहरने म्हणाला“अरे देवा हे चांगलं लक्षात आहे आणि त्यानंतर काय झालं हे तर विसरूच शकत नाही.”अशी कमेंट करणने केली होती.

काजोलची तात्पुरती स्मृती गेली होती
सिनेमातून हा सीन वगळण्यात आलाय. मात्र सायकलवरून पडल्यामुळे काजोलची तात्पुरती स्मृती गेली होती. काजोल सायकलिंगमध्ये अजिबात चांगली नाही असं शाहरुख खान एका मुलाखतीत म्हणाला होता. ” आम्ही सायकल चालवताना हात मोकळे ठेवणं अपेक्षित होतं. पण काजोल अचानक चेहऱ्यावरच पडली. ती आमच्याकडे बघून हसू लागली त्यामुळे मग सहाजिकच आम्ही देखील ती पडली म्हणून हसू लागलो.” पुढे तो म्हणाला, “काजोलच्या पायाला खरचटलं होतं आणि तिला काही आठवतं नव्हत तेव्हा आम्ही थोडे गंभीर झालो. तिला काही काळासाठीचा स्मृतिभ्रंश झाला होता. नशीबाने तिला अजय देवगण लक्षात होता.” असं म्हणत शाहरुखने मजेशीर प्रतिक्रिया दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kajol birthday unseen video from kuch kuch hota hai where kajol fell on her face leading to a temporary memory loss kpw

ताज्या बातम्या